शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधिकरणामुळे उडाली झोप

By admin | Updated: September 1, 2014 23:55 IST

जीवन प्राधिकरणच्या नळ सोडण्याची कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येते. वारंवार तक्रारी करूनही येथील अभियंते व कर्मचारी दाद देत नाही. जीवन प्राधिकरणच्या कारभाराने नागरिकांची झोप उडविली आहे.

यवतमाळ : जीवन प्राधिकरणच्या नळ सोडण्याची कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येते. वारंवार तक्रारी करूनही येथील अभियंते व कर्मचारी दाद देत नाही. जीवन प्राधिकरणच्या कारभाराने नागरिकांची झोप उडविली आहे. मध्यरात्री नळ येत असल्याने संपूर्ण रात्रच पाण्यासाठी जागून काढावी लागत आहे. दिवसा नळ सोडण्याबाबत वारंवार तक्रारी करूनही जीवन प्राधिकरणने आपल्या वेळेत बदल केला नाही.शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. या कार्यालयात कुणाचाच पायपोस कुणाला नसल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहे. पाणी सोडण्याच्या वेळेचे नियोजन नसल्याने राजेंद्रनगर, गांधीनगर, नेहरूनगर, वंजारीफैल यासह इतरही भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. या भागात मध्यरात्री नळ येतात. पाण्यासाठी नागरिकांना दिवसभर काम करूनही रात्र जागावी लागते. नळ आल्यानंतर मध्यरात्रीच पाणी भरावे लागते. विशेष म्हणजे दिवस उजाडताच या भागातील नळ बंद होतात. चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नेमक्या कोणत्या रात्री नळ येणार हेही निश्चित नसते. प्रत्येक वेळा नळ आले का, हे तपासून पहावे लागते. आता तर नागरिकांनी नळ पाण्यासाठी परिसरातच पाळी ठरवून दिली आहे. नळ आल्याची माहिती फोनद्वारे आपल्या शेजाऱ्या, पाजाऱ्यांना दिली जाते. तेव्हाच पाणी भरण्याशिवाय पर्याय उरत नाही. जीवन प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याकडे या बाबत तक्रारी घेऊन गेलेल्या नागरिकांना तो भाग माझ्याकडे येत नाही, असे सांगून टोलवाटोलवी केली जाते. आता भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी रात्र जागविण्याची वेळ शहरातील नागरिकांवर आली आहे. जीवन प्रधिकरणने नळाच्या वेळेत बदल करावा, दिवसा कोणत्याही वेळेस नळ आले तर पाणी भरणे सहज शक्य आहे. मात्र याला प्रतिसाद न मिळाल्यास नागरिकांकडून उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)