शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतून काढलेले सहा लाखांचे सोने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

शेतकरी असलेल्या देशमुख यांच्याकडे विवाह समारंभ असल्याने त्यांनी आपले यवतमाळ अर्बन बँकेच्या दिग्रस शाखेतील लॉकरमध्ये असलेले ४७ तोळे सोन्याचे दागिने बुधवारी काढले. हे दागिने त्यांनी बॅगमध्ये ठेऊन ती बॅग आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवली. दरम्यान दिग्रसमधील एका सलून व्यावसायिकाकडे ते लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेले. पत्रिका देऊन पाचच मिनिटात परत आले असता रस्त्यावर उभ्या ठेवलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतील सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्याने क्षणाधार्थ उडविली.

ठळक मुद्देचोरटा सीसीटीव्हीत कैद : दागिने कुठेच सुरक्षित राहिले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोन्याचे दागिने अंगावर घातले तरी चोराची भीती, घरात ठेवले तरी चोराची भीती. म्हणून लोक आता बँकांच्या लॉकरमध्ये दागिने ठेवतात. परंतु चोरटे आता लॉकरमधून दागिने काढणाऱ्यांवरही पाळत ठेऊ लागले आहे. अशाच पाळतीतून एका चोरट्याने सहा लाख रुपये किंमतीचे ४७ तोळे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले.ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस शहरात बुधवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भरचौकात घडली. प्रभाकर मोहनराव देशमुख (६१) रा. सिंगद ता. दिग्रस असे यातील फिर्यादीचे नाव आहे. शेतकरी असलेल्या देशमुख यांच्याकडे विवाह समारंभ असल्याने त्यांनी आपले यवतमाळ अर्बन बँकेच्या दिग्रस शाखेतील लॉकरमध्ये असलेले ४७ तोळे सोन्याचे दागिने बुधवारी काढले. हे दागिने त्यांनी बॅगमध्ये ठेऊन ती बॅग आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवली. दरम्यान दिग्रसमधील एका सलून व्यावसायिकाकडे ते लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेले. पत्रिका देऊन पाचच मिनिटात परत आले असता रस्त्यावर उभ्या ठेवलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतील सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्याने क्षणाधार्थ उडविली. या दागिन्यांची किंमत पाच लाख ७४ हजार रुपये एवढी सांगितली जाते. त्यांनी घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना दिली.बँकेतून निघणाऱ्या ग्राहकांवर चोरट्यांची नजरग्राहक बँकेत पैसे टाकायला, काढायला जातो, कुणी ग्राहक दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी जातो. अशा ग्राहकांवर चोरट्यांची कायम नजर असते. अनेक बँकांच्या समोर हे चोरटे वेगवेगळ्या निमित्ताने उभे असतात. कधी ते विक्रेते म्हणूनही दिसतात. ग्राहकाच्या हालचालीवरून त्यांच्याकडे कॅश, दागिने हा ऐवज आहे का याचा अंदाज चोरटे बांधतात. खात्री पटताच त्या ग्राहकाचा पाठलाग केला जातो.तपासात चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. तो दिग्रसमधील असावा किंवा एखादवेळी लग्न सोहळ्याबाबत माहिती असल्याने सिंगदमधील असण्याची शक्यता आहे.-उदयसिंह चंदेलउपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हादागिन्यांचा प्रवास असुरक्षितबँकेतून निघालेल्या ग्राहकाच्या हाती बॅग असेल तर त्याच्या अंगावर तोंडात बिस्कीट खावून थुंकणे, उलटी करणे, तुमच्या अंगावर घाण पडली असे खोटे सांगणे अशी शक्कल लढविली जाते. ग्राहक ते धुण्यासाठी नळावर जाताच चोरटे त्याची बॅग घेऊन पोबारा करतात. बहुतांश बसस्थानकावर असे प्रकार घडतात. दिग्रसमधील या घटनेने आता दागिने लॉकरमध्ये सुरक्षित असले तरी या दागिन्यांचा बँक ते घर किंवा घर ते बँक हा प्रवास सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

टॅग्स :Thiefचोर