शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या लांबण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील साडेसात हजार शिक्षकांना बदल्यांचे वेध लागलेले आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी सुधारित धोरणही जाहीर केले. त्यानुसार ३१ मेपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी मे महिन्यापूर्वीच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने रिक्त पदे, सेवाज्येष्ठता याद्या, संवर्गनिहाय याद्या, जिल्ह्यातील अवघड गावांची यादी, आदी माहिती तयार ठेवणे अपेक्षित होते.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : दिवाळीनंतरच मुहूर्त निघण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदशिक्षकांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्या यंदाही कोरोनामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने यंदा ३१ मेपर्यंत बदल्या करण्याचे धोरण जाहीर केले. मात्र, ८ मे उजाडूनही याबाबत राज्य स्तरावरून जिल्हा परिषदेला कोणताही कार्यक्रम मिळालेला नाही, तर दुसरीकडे कोरोना निस्तरल्यास दिवाळीनंतरच बदल्यांची प्रक्रिया पार पडली जाईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील साडेसात हजार शिक्षकांना बदल्यांचे वेध लागलेले आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी सुधारित धोरणही जाहीर केले. त्यानुसार ३१ मेपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी मे महिन्यापूर्वीच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने रिक्त पदे, सेवाज्येष्ठता याद्या, संवर्गनिहाय याद्या, जिल्ह्यातील अवघड गावांची यादी, आदी माहिती तयार ठेवणे अपेक्षित होते. तसेच राज्य स्तरावरून शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणेही आवश्यक होते. परंतु, अजूनही अशी सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांचा जीव टांगणीला लागलेला आहे, तर दुसरीकडे, काही शिक्षक संघटनांनी थेट ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करून बदल्यांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता दिवाळीनंतरच ही प्रक्रिया केली जाण्याची शक्यता मंत्रिमहोदयांनी वर्तविल्याचे या संघटनांकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात कोरोनाची वाढती दु:स्थिती आणि कार्यालयांमधील केवळ १५ टक्के उपस्थिती बघता प्रक्रिया लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षीही अशाच पद्धतीने बदल्या जाहीर होऊन कोरोनाच्या कारणास्तव ऐनवेळी रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

बदली प्रक्रियेबाबत आपली पूर्ण तयारी झाली आहे. रिक्त पदांच्या याद्या, सेवाज्येष्ठता याद्या तयार आहे. मात्र, अवघड क्षेत्रांबाबत केवळ पेसा व नक्षलग्रस्त क्षेत्राची माहिती आली. मात्र, बांधकाम, पोलीस, बीएसएनएल, आदींकडून माहिती आलेली नाही. ती सोमवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. शिवाय बदल्यांबाबत अद्याप राज्य स्तरावरून कोणताही कार्यक्रम देण्यात आलेला नाही.- प्रमोद सूर्यवंशी,  शिक्षणाधिकारी

यंदा कोणत्याही परिस्थितीत बदल्या रद्द होऊ देणार नाही. या जीआरनुसार सर्व प्रक्रिया ऑनलाईन करावी लागणार असल्याने कोरोनाबाबत अडचण येण्याची शक्यताच नाही. तरीही दक्षता म्हणून आम्ही सीईओंची भेट घेऊन जीआरनुसार प्रक्रिया पूर्ण करण्याचे साकडे घातले आहे. इतर जिल्हा परिषदांमध्ये प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. - दिवाकर राऊत, जिल्हाध्यक्ष, इब्टा शिक्षक संघटना 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक