शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील पदोन्नतीने वाढणार शिक्षकांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात विस्तार अधिकारी पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देदुर्गम गावातील शाळांचा प्रश्न : विस्तार अधिकारी यादीतही चुका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विस्तार अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने पदोन्नतीचे दार उघडले आहे. त्यामुळे बीएडधारक शिक्षकांना अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बढतीची संधी चालून आली आहे. मात्र दुसरीकडे आधीच तुटवडा असलेल्या सहायक शिक्षकांची तूट काही शेकड्यांवरून हजारांवर जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांना बढती देणे आणि शिक्षकांची रिक्त पदे भरून काढणे हा दुहेरी समतोल साधण्याची कसरत अधिकाऱ्यांना करावी लागेल.जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात विस्तार अधिकारी पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. १४७८ शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या यादीत अनेक नावे दोनदा टाकण्यात आली आहे. तर अनेक पात्र शिक्षकांची नावेच गायब आहेत. केंद्र प्रमुख सभेने पुन्हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर शिक्षणाधिकाºयांनी २८ मेपर्यंत पुन्हा आक्षेप मागविले आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊन कालावधीत होणाºया या पदोन्नतीमुळे जिल्ह्यात शिक्षकांचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे.जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य मधुकर काठोळे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून दुर्गम गावांमध्ये शिक्षकच उपलब्ध नाहीत. आता विस्तार अधिकारी म्हणून शिक्षकांची बढती झाल्यास आणखी अनेक शाळा शिक्षकांना मूकणार आहेत. कोरोनामुळे मजूर खेड्यात परतल्याने पटसंख्या वाढणार असून त्यासाठी जादा शिक्षक कसे मिळतील हा प्रश्न आहे.बदल्या, भरतीसाठी जिल्हा परिषदेवर बंदीएकीकडे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बढत्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाने नवीन शिक्षक नियुक्ती, बदल्यांवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे बढतीमुळे शाळा सोडून तालुका पातळीवर जाणाºया शिक्षकामुळे शाळेतील जागा रिक्त होणार आहे. मात्र शासनाच्या निर्बंधामुळे तेथे नवा शिक्षक देणे किंवा बदलीने दुसरा शिक्षक पाठविणे अशक्य होईल.

टॅग्स :Socialसामाजिक