शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना शेड, शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

गुरुवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी अचानक बंद करण्यात आल्याचे कळताच, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी गुरुवारी सायंकाळी बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. त्यानंतर त्यांनी बाजार समितीतील समस्यांचा पाढाच वाचला. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एमएसपीनुसार खरेदी न करता व्यापारी थेट विक्रेत्यांना फोन करून मालाचा भाव ठरवीत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मागील काही दिवसांपासून आपल्या गलथान कारभारामुळे चांगलीच चर्चेत आहे. या बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट होत आहे. व्यापारीधार्जिण्या बाजार समितीने व्यापाऱ्यांना धान्य ठेवण्यासाठी शेड दिले. मात्र, शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर आहे.गुरुवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी अचानक बंद करण्यात आल्याचे कळताच, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी गुरुवारी सायंकाळी बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. त्यानंतर त्यांनी बाजार समितीतील समस्यांचा पाढाच वाचला. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एमएसपीनुसार खरेदी न करता व्यापारी थेट विक्रेत्यांना फोन करून मालाचा भाव ठरवीत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. तसेच आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम समजल्या जाणाऱ्या वणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा माल उघड्यावर खरेदी केला जातो. तर,  व्यापाऱ्यांच्या मालासाठी शेड दिले जाते, अशी माहिती या ठिकाणी मिळाली. शेतकऱ्यांनी माल उतरविल्यानंतर त्यांच्या मालाचा भाव ठरविला जात असल्याचा आरोप राजू उंबरकर यांनी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या जिवावर उठली की काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हा प्रकार तातडीने बंद करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी बाजार समित्यांची स्थापना झाली. परंतु वणी बाजार समितीत उलटाच कारभार सुरू आहे. मनसेतर्फे हिंगणघाट बाजार समितीत एकदिवसीय अभ्यास दौरा आयोजित करणार असून, खरेदी प्रक्रियेतील बारकावे शेतकऱ्यांना समजावे याकरिता हा अभ्यास दौरा असणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाईल.                                      - राजू उंबरकर, राज्य उपाध्यक्ष, मनसे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड