शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

१३९ कोटी खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवा

By admin | Updated: May 28, 2016 02:21 IST

जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि सहा नगरपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजनेसाठी प्राप्त निधींचा खर्च कसा करावा

विकासाची दिशा : १० नगरपरिषदा व ६ नगरपंचायतींना सूचना सुरेंद्र राऊत यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि सहा नगरपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजनेसाठी प्राप्त निधींचा खर्च कसा करावा याची मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. तब्बल १३८ कोटी ८४ लाखांच्या खर्चाबाबत प्राधान्यक्रम कसा घ्यावा याचे निर्देश दिले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून नगरविकासाच्या महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जातात. या योजनांचा निधी शहर विकासासाठी योग्य पद्धतीने खर्च व्हावा यासाठी प्रत्येक योजनानिहाय निधी खर्चाचे निकष ठरविण्यात आले आहे. दलित वस्ती योजना, आदिवासी वस्ती योजना, रस्ता अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, केंद्र सरकारचे अमृत अभियान, राज्य शासनाचे अमृत अभियान, रस्त्यासाठी विशेष अनुदान, हद्दवाढ अनुदान, नगरोत्थान अभियानाचा निधी या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी नगरपरिषद-नगरपंचायतींना पुरविण्यात येतो. निधीतून कुठली कामे घ्यावी याचा प्राधान्यक्रम ठरविण्यावरून पालिकास्तरावर अनेक वाद होतात. बऱ्याचदा ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली जाते. यामुळे निर्धारित वेळेत हा निधी खर्च करता येत नाही, परिणामी विकासाची प्रक्रिया मंदावते. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी वरील योजनांचा निधी कोणत्या पद्धतीने कामांचा प्राधान्यक्रम ठरवून खर्च करावा, हे स्पष्ट करणारे पत्र त्या नगरपरिषद नगराध्यक्षांना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. या पत्राच्या आधारावर कायद्याच्या चौकटीत राहून विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरविणे सहज शक्य आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींना २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त झालेल्या निधीतून विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवायचा आहे. आर्थिक वर्षात असा मिळाला निधीयवतमाळ नगरपरिषदेकडे ५३ कोटी ६६ लाख रुपये निधी आहे. वणी नगरपरिषदेकडे ३ कोटी ५६ लाख, पुसद नगर परिषदेकडे २ कोटी ९५ लाख, दिग्रस नगरपरिषदेला १२ कोटी ७९ लाख, दारव्हा नगर परिषदेला ११ कोटी ९९ लाख, पांढरकवडा नगरपरिषदेला ६ कोटी ७८ लाख, उमरखेड नगरपरिषदेला सात कोटी, घाटंजी नगरपरिषदेला ३ कोटी ८७ लाख, नेरनबाबपूर नगर परिषदेला १५ कोटी ७१ लाख, आर्णी नगर परिषदेला एक कोटी, मारेगाव नगरपंचायतीला २० लाख, झरीजामणी नगरपंचायतीला ३ कोटी २० लाख, महागाव नगरपंचायतीला ५ कोटी २० लाख, बाभूळगाव नगरपंचायतीला २ कोटी २० लाख, कळंब नगरपंचायतीला ५ कोटी २० लाख, राळेगाव नगरपंचायतीला ३ कोटी २० लाख असा निधी २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त झाला होता.