शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्राची चोरी करणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: September 11, 2014 23:52 IST

तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे रोहित्र फोडून त्यातील तांब्याची तार लंपास करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तालुक्यात गेल्या पाच-सहा वर्षांपासून रोहित्र फोडण्याच्या घटनांचा

मारेगाव : तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे रोहित्र फोडून त्यातील तांब्याची तार लंपास करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तालुक्यात गेल्या पाच-सहा वर्षांपासून रोहित्र फोडण्याच्या घटनांचा शोध लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़गेल्या पाच-सात वर्षांपासून तालुक्यातील वीज कंपनीचे रोहित्र फोडून त्यातील तांब्याची तार चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडत होत्या़ रोहित्रासोबतच खांबांवरील अ‍ॅल्युमिनीअमचे तारसुद्धा चोरीला जात होते़ परंतु चोरटे सर्व माल लगतच्या राज्यात नेऊन विकत असल्याने आणि चोरट्यांचे राज्यात मोठे जाळे असल्याने ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते़ मारेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आंबेझरी येथे गेल्या ३ सप्टेंबरला रोहित्र फोडल्याची घटना घडली़ तक्रार प्राप्त होताच ठाणेदार उमेश पाटील यांनी खास पथक तयार करून अवघ्या तीन दिवसात या टोळीच्या म्होरक्याला जेरबंद करण्यात यश मिळविले़ अटक करण्यात आलेल्यांमध्ये सैय्यद रमजान सैय्यद गुलाम (२७), सैय्यद सद्दाम सैय्यद उस्मान (१९), जितेश महादेव डहाके (२२), रा़ सर्व वणी यांचा समावेश आहे़ आरोपींनी मारेगाव तालुक्यासह पांढरकवडा तालुक्यातही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे़ या चोरट्यांचे जाळे राज्य व राज्याबाहेर पसरले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यातून अनेक चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता आहे़ तीनही आरोपींना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या तीन दिवसात चोरट्यांकडून बरीच माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे़ या प्रकरणाचा तपास ठाणेदार उमेश पाटील, सहाय्यक ठाणेदार मंगेश भोयर, हवालदार मनोज बोडलकर, अब्दुल नईम शेख, सचिन मरकाम, सुहास मंदावार, शमशुद्दीन मलनस करीत आहे़ (शहर प्रतिनिधी)