शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव बायपासवरील पेट्रोलपंपावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

उदय धरमसिंह रा.यवतमाळ यांच्या मालकीचे हे पेट्रोलपंप आहे. रात्रीपर्यंत जमा झालेली रोख रक्कम दररोज घरी अथवा बँकेत जमा केली जाते. त्यामुळे पेट्रोलपंपावर रात्रीदरम्यान रोख रक्कम राहात नाही. असे असले तरी सोमवारी पहाटे ३ वाजता चेहरा झाकलेल्या अवस्थेत चार जण पेट्रोलपंपावर आले.

ठळक मुद्देपहाटे ३ वाजताची घटना : चौकीदाराला पकडून केली तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील धामणगाव-नागपूर या बायपासवर असलेल्या पेट्रोलपंपावर पहाटे ३ वाजता चार जणांनी दरोडा घातला. दरोडेखोरांच्या हाती रोख रक्कम लागली नाही. त्यामुळे त्यांनी चौकीदाराला पकडून पेट्रोलपंपाची तोडफोड केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नुकसानीचा गुन्हा दाखल आहे.उदय धरमसिंह रा.यवतमाळ यांच्या मालकीचे हे पेट्रोलपंप आहे. रात्रीपर्यंत जमा झालेली रोख रक्कम दररोज घरी अथवा बँकेत जमा केली जाते. त्यामुळे पेट्रोलपंपावर रात्रीदरम्यान रोख रक्कम राहात नाही. असे असले तरी सोमवारी पहाटे ३ वाजता चेहरा झाकलेल्या अवस्थेत चार जण पेट्रोलपंपावर आले. त्यांनी चौकीदाराला ताब्यात घेऊन बाजूला बसवले. नंतर पेट्रोलपंपावरील कॅबीनच्या काचा फोडून आत प्रवेश केला. ड्रॉव्हर, लॉकर, पेचकच व लोखंडी सळाखीने फोडले. इतकेच नव्हेतर आॅईलच्या गोदामाचे दार तोडून रोख रक्कम मिळते का पाहिले. हा संपूर्ण घटनाक्रम पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. चारही चोरटे जवळपास अर्धातास धुमाकूळ घालत होते. हाती काही न लागल्याने अखेर ते निघून गेले. विशेष म्हणजे पहाटे २.३० वाजताच्या सुमारास पोलिसांची पेट्रोलिंग वाहन पेट्रोलपंपासमोरून निघून गेले. त्यानंतर अर्ध्या तासाने हे दरोडेखोर पेट्रोलपंपावर आले होते. त्यांच्याजवळ लोखंडी सळाखी, पेचकच, दोरी असे साहित्य होते. ही घटना कायद्याच्या चौकटीत दरोड्याच्या गुन्ह्यात बसणारी नसली तरी तिची तीव्रता दरोड्याइतकीच आहे. चौकीदाराला धमकावत तोडफोड झाली. जवळपास ५० हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शहर ठाण्यात नुकसानाची गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या घटनेची तीव्रता कमी झाली आहे. निर्ढावलेल्या हल्लेखोरांचा शोध घेणे आवश्यक आहे. राजरोसपणे वर्दळीच्या मार्गावरचे पेट्रोलपंप फोडण्यास हे आरोपी मागेपुढे पाहात नाही. भविष्यात त्यांच्याकडून मोठी घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांकडून विशेष कोणत्याच हालचाली झाल्या नाही.

टॅग्स :Thiefचोर