शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
3
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
4
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
5
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
6
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
7
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
8
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
9
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
10
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
11
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
12
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
13
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
14
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
15
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
16
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
17
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
18
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
19
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
20
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

किशोर तिवारींविरोधात कर्मचारी संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 9:45 AM

किशोर तिवारी यांनी घाटंजी येथे कर्ज मेळाव्याबाबत जनसभा वजा बैठक घेतली. बैठकीची नियोजित वेळ सकाळी 11 ची असताना अध्यक्ष 1.30 वाजता सभास्थळी आल्याचा संघटनांचा दावा आहे.

यवतमाळ : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याविरोधात महसूल संघटना आक्रमक झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांच्याबाबत अपशब्द बोलून अपमानित केल्याचा तिवारींवर आरोप आहे. याविरोधात महसूल विभागाच्या सात कर्मचारी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. किशोर तिवारींचा निषेध नोंदवत संघटनांनी शुक्रवारी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तिवारींनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

किशोर तिवारी यांनी घाटंजी येथे कर्ज मेळाव्याबाबत जनसभा वजा बैठक घेतली. बैठकीची नियोजित वेळ सकाळी 11 ची असताना अध्यक्ष 1.30 वाजता सभास्थळी आल्याचा संघटनांचा दावा आहे. तहसीलदार कार्यालयीन काम असल्याने कार्यालयात होत्या. बैठकीसाठी नायब तहसीलदार यांच्यासोबत इतर अधिकार्‍यांना पाठवलं आणि मिशनचे अध्यक्ष आल्यानंतर त्याबाबत कळवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

या बैठकीत किशोर तिवारी यांनी महिला तहसीलदारांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप होते. याशिवाय नायब तहसीलदार यांनाही अपमानित केल्याचा आरोप तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने केला आहे. एका तहसीलदाराला धमकीवजा फोन करतांनाचा किशोर तिवारी यांचा ऑडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. वारंवार होणार्‍या या अपमानामुळे महसूल विभागाच्या सर्व संघटनांनी दंड थोपटले असून, किशोर तिवारी यांचा निषेध नोंदवत शुक्रवारी बंद पुकारला आहे.

या संपात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, वाहनचालक, चर्तुर्थश्रेणी कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा समावेश आहे. सर्व संघटनांनी लेखी माफीनामा मागितला आहे. तो न दिल्यास पुढील आंदोलनाची दिशा शुक्रवारी ठरविणार असल्याचं सांगितलं.

किशोर तिवारींचं स्पष्टीकरण

“पीककर्ज वाटपाचा अहवाल विचारला तरी पूजा मॅडम या कार्यालयात बसून होत्या. त्यांनी नायब तहसीलदाराला पाठवलं. या मॅडम समाजसेवक, शेतकरी यांचा सतत अपमान करतात आणि प्रत्येक कामाला जीआर मागतात, अशा पत्रकारांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे पूजा मॅडमला आत्ताच बोलवा असा निरोप पाठवला. त्यातच पाच निराधार महिलांचे अनुदान बंद केल्याचा प्रकार समोर आला. यावेळी दुसऱ्या एक पूजा मॅडम आल्या आणि त्यांना दीनदयाल अंत्योदय योजनेची प्रगती विचारली. काहीही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने रागाच्या भरात सर्व अधिकाऱ्यांना सुनावलं. पण कुणाचाही अपमान केलेला नाही,” असं स्पष्टीकरण किशोर तिवारी यांनी दिलंय.

दरम्यान, 30 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात आपण कोणत्याही आई-बहिणीचा अपमान केलेला नाही. या अधिकारी-कर्मचारी माझ्या मुलीसारख्या आहेत. तरीही त्यांची मनं दुखावली असतील तर विनाशर्त माफी मागतो. हा प्रकार समजल्यानंतर व्यथित होऊन पूजा मॅडम यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असंही किशोर तिवारी यांनी म्हटलंय. संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि आरोपांची शहानिशा करण्यासाठी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली समिती गठीत करावी. दोषी असल्यास माझ्याविरोध फौजदारी कारवाई करावी, असंही किशोर तिवारी यांनी म्हटलंय.