शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पिके उद्ध्वस्त, तरीही पीक आणेवारी ५८ पैसे कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

शासकीय यंत्रणेने काढलेली पहिली नजर पीक आणेवारी ६५ पैसे एवढी होती. जनतेतून ओरड सुरू झाल्यानंतर ही आता सात पैशाने कमी करून ५८ वर आणण्यात आली आहे. ३१ आॅक्टोबरला ही पीक आणेवारी जाहीर झाली. ती सरसकट ५८ टक्के असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आणेवारीचे हे आकडे म्हणजे बँकांना आपल्या कर्जवसुली मोहिमा सुरू करण्यास हिरवा कंदील असल्याचेही मानले जाते.

मॅनेज असल्याची ओरड : बँकांना वसुलीची मुभा, गावागावांत रोषलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप हंगामात निसर्गाची साथ न मिळाल्याने आधीच पीक परिस्थिती डबघाईस आली आहे. त्यातच आता परतीच्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यानंतरही शासनाने काढलेली सुधारित पीक आणेवारी ५८ वर कायम आहे. ते पाहता ही पीक आणेवारी मॅनेज असल्याची ओरड गावागावांतून होऊ लागली आहे.शासकीय यंत्रणेने काढलेली पहिली नजर पीक आणेवारी ६५ पैसे एवढी होती. जनतेतून ओरड सुरू झाल्यानंतर ही आता सात पैशाने कमी करून ५८ वर आणण्यात आली आहे. ३१ आॅक्टोबरला ही पीक आणेवारी जाहीर झाली. ती सरसकट ५८ टक्के असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आणेवारीचे हे आकडे म्हणजे बँकांना आपल्या कर्जवसुली मोहिमा सुरू करण्यास हिरवा कंदील असल्याचेही मानले जाते. आधीच शेतकऱ्यांची अवस्था वाईट असताना आणेवारीने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले तर आता बँकांकडून पीक व मुदती कर्जाच्या वसुलीसाठी नोटीसा येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पहायला मिळते.यापूर्वी नजर आणेवारी ६५ टक्के जाहीर झाली होती. या स्थितीचा बँकांनी फायदा घेत जिल्ह्यातील अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीस बजावल्या. आता सुधारित पीक आणेवारी वास्तवाला धरुन कमी येईल असा अंदाज शेतकºयांचा होता. प्रत्यक्षात सरासरी पीक पैसेवारी ५८ टक्के निघाली आहे. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहे. ५० पैशावर पैसेवारी असेल तर पीक स्थिती उत्तम असल्याचे संकेत असतात. सर्वच तालुक्यातील पीक स्थिती अहवालानुसार उत्तम आहे. यामुळे महसूल विभागाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निघालेल्या सोयाबीनचे एकरी उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी घटले आहे.सुधारित आणेवारीयवतमाळ ५९ पैसे, कळंब ६५ पैसे, बाभूळगाव ५७ पैसे, आर्णी ५७ पैसे, दारव्हा ५६ पैसे, दिग्रस ५५ पैसे, नेर ५८ पैसे, पुसद ५८ पैसे, उमरखेड ६५ पैसे, महागाव ५७ पैसे, केळापूर ६० पैसे, घाटंजी ५६ पैसे, राळेगाव ५७ पैसे, वणी ५६ पैसे, मारेगाव ६२ पैसे तर झरी जामणी ५६ पैसे अशी सुधारित पैसेवारी जाहीर झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी