पुसद रिलिफ फंडाची पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:07+5:30

पूरग्रस्त कुटुंबीयांना पुसद रिलीफ फंडच्या वतीने तब्बल तेरा लाख रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याची मदत देण्यात आली. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून साहित्याच्या ट्रकला भगवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

Pusad Relief Fund helps flood victims | पुसद रिलिफ फंडाची पूरग्रस्तांना मदत

पुसद रिलिफ फंडाची पूरग्रस्तांना मदत

Next
ठळक मुद्देगृहोपयोगी वस्तू रवाना : कर्मचारी आणि सर्वसामान्यांची माणुसकी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्त कुटुंबीयांना पुसद रिलीफ फंडच्या वतीने तब्बल तेरा लाख रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याची मदत देण्यात आली. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून साहित्याच्या ट्रकला भगवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यवतमाळ विभाग संघचालक प्रा. सुरेश गोफने, आमदार निलय नाईक, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, डॉ. मोहंमद नदीम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार, नगरसेवक निशांत बयास, धनंजय अत्रे, विनोद जिल्हेवार, उमाकांत पापीनवार, निखिल चिद्दरवार, विजय जाधव, गिरीश अग्रवाल, अशोक बाबर, राजू साळुंखे उपस्थित होते. 
पुसद अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक २ लाख ४४ हजार ५०९ रुपये, शहरातील मदत रॅलीमध्ये २ लाख ११ हजार, भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेने ५१ हजार रुपये व भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी २६ हजार रुपये, सर्व शैक्षणिक संस्था ८१ हजार ९४६ रुपये, विश्वनाथसिंग बयास पतसंस्था ५१ हजार, मुस्लिम समाजाच्या वतीने ५६ हजार, पिडीए ४३ हजार, शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ३१ हजार, औषध विक्रेता संघ ३१ हजार रुपये, कापड विक्रेता संघ २१ हजार, वत्सलबाई नाईक महिला महाविद्यालय २० हजार ३७० रुपये या मोठ्या रकमांसमवेत ४-५ अंकी रकमा मदत स्वरूपात मिळाल्या आहेत.
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याचा सर्वे करण्यात आला. त्याअंती सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील धनगाव, संतगाव, बोरबन, सूर्येगाव व भुवनेश्वरवाडी या पाच गावी तब्बल ८५० किट वितरित केल्या जाणार आहेत. साहित्य भरलेल्या ट्रकला भगवी झेंडी दाखविताना विजय जाधव, अभय गडम, जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक, विश्वास भवरे, नितीन पवार, प्रवीर व्यवहारे, पुंडलिक शिंदे, राहुल कांबळे, शेख कयूम, मनिष अनंतवार, डॉ. पंकज जयस्वाल, श्रीराम पवार, नारायण पाटील मुडानकर, यशवंतराव चौधरी, सुनील भालेराव, एम.आर. राठोड, ओमप्रकाश शिंदे, सुशांत महाले उपस्थित होते.

पाच गावे दत्तक
पुसद रिलीफ फंडने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णा नदीकाठी वसलेली धनगाव, संतगाव, बोरबन, सूर्येगाव व भुवनेश्वरवाडी ही पाच गावे दत्तक घेतली आहेत.

साडेआठशे किट
४ ताट, ८ वाट्या, ४ ग्लास, ४ प्लेट, २ गंज, १ पळी, १ बकेट, २ सोलापुरी चादर असे दैनंदिन गृहोपयोगी साहित्य समाविष्ठ असलेल्या भरीव साडेआठशे किट पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आल्या.

Web Title: Pusad Relief Fund helps flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.