शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकीनंतर दारव्ह्यात पोलिसांची छावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

पोलीस ठाण्यात मृत्यू झालेल्या युवकाचे शव बुधवारी सकाळी वैद्यकीय चिकत्सेकरिता यवतमाळात आणण्यात आले. खबरदारी म्हणून शवविच्छेदनगृह व यवतमाळ शहरातील   प्रमुख कार्यालयांभाेवताली कडेकाेट पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. दारव्हा येथे  पाेलीस ठाण्यावर दगडफेक झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर पाेलीस ठाण्यांतून कुमक दारव्हा येथे पाठविण्यात आली.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात युवकाचा मृत्यू : तीन जिल्ह्यातील पोलीस दाखल, यवतमाळात बंदोबस्तात शवविच्छेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  दारव्हा येथे रस्त्यावर गाेंधळ घालणाऱ्या तिघांना पाेलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. यातील एकाचा पाेलीस ठाण्यात मृत्यू झाला. त्यानंतर  रात्री जमावाने दारव्हा पाेलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करीत पाेलिसांच्या वाहनाची ताेडफाेड केली.  यानंतर दारव्हा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल दाखल झाले.  पोलीस ठाण्यात मृत्यू झालेल्या युवकाचे शव बुधवारी सकाळी वैद्यकीय चिकत्सेकरिता यवतमाळात आणण्यात आले. खबरदारी म्हणून शवविच्छेदनगृह व यवतमाळ शहरातील   प्रमुख कार्यालयांभाेवताली कडेकाेट पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. दारव्हा येथे  पाेलीस ठाण्यावर दगडफेक झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर पाेलीस ठाण्यांतून कुमक दारव्हा येथे पाठविण्यात आली. जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पाेलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे मंगळवारी रात्रीपासून दारव्हा पाेलीस ठाण्यात तळ ठाेकून आहेत.  मृतक शेख इमरान शेख शब्बीर (३०), रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा यांचा मृतदेह यवतमाळात वैद्यकीय चिकत्सेकरिता आणण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात इन कॅमेरा चिकित्सा करण्यात आली. यावेळी मृताचा भाऊ शेख जाबीर शेख शब्बीर यांच्यासह काही नातेवाईक उपस्थित हाेते. खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पाेलीस अधीक्षक कार्यालय येथे पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. पाेलीस ठाण्यात युवकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दारव्हाचे पडसाद यवतमाळात उमटू नयेत यासाठी पाेलिसांनी सर्वच प्रमुख कार्यालयांसमाेर बंदाेबस्त लावला हाेता. 

मारहाणीनेच मृत्यू झाल्याचा आराेप -  शेख इमरान यांंना दारव्हा पाेलीस ठाण्यात मंगळवारी रात्री हतकडी लावून बेदम मारहाण झाली. या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला, असा आराेप शेख जाबीर यांनी केला आहे. दाेषी चार पाेलीस कर्मचाऱ्यांविराेधात कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे केली. साेबतच या प्रकरणाची सीआयडी चाैकशी केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

 बाहेर जिल्ह्यातून ९०० पाेलीस दाखल - दारव्हा येथे पाेलीस ठाण्यावर दगडफेक झाली. यात तीन पाेलीस कर्मचारी जखमी झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्याबाहेरून सहा पाेलीस निरीक्षक, सहा सहायक पाेलीस निरीक्षक व ९०० पाेलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर शेख इमरान यांचा दफनविधी हाेईपर्यंत दारव्हा व यवतमाळ येथे बंदाेबस्त लावण्यात आला आहे. 

दारव्हा येथे जमावबंदी - दारव्हा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी जमावबंदी आदेश जारी केला आहे. - शहरातील प्रमुख चौकात दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त कायम होता. तणावपूर्ण शांततेत शहरातील बाजारपेठ सुरु होती. - शेख इरफान याची शवचिकित्सा झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर दारव्हा येथे रितीरिवाजाप्रमाणे दफन विधी करण्यात आला. यावेळी कुटुंबीयासह मोठ्यासंख्येने  उपस्थित होते. दफनविधी शांततेत पार पडला. 

 

टॅग्स :Policeपोलिस