शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस घेतलेल्यांनाच ‘देवी’ पावणार; नवरात्रीत ‘जगदंबा माते’चे घेता येणार दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:00 IST

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शासनाचे सर्व नियम पाळ‌ावेत. याबाबत नियमावलीचे फलक लावण्यात आले आहेत.  प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य आहे. भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे.  गर्भगृहासमोर लावलेल्या काचेच्या दरवाजापासून दर्शन घ्यावे.  सर्वांनी तोंडाला मास्क लाऊनच मंदिरात प्रवेश करावा, भक्तांनी रांग लावताना विशिष्ट अंतर ठेवावे. 

नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : संपूर्ण विदर्भातच नव्हे तर मराठवाडा व शेजारच्या तेलंगणातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या केळापूर येथील प्रसिद्ध  श्री जगदंबा संस्थानात येत्या ७ तारखेपासून ते १४ तारखेपर्यंत नवरात्र उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे. संस्थांनतर्फे  नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. विश्वस्त मंडळार्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या  आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या अटी व शर्ती राखून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून दर्शन घेण्याची विनंती संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे यांनी केली आहे. 

मंदिरात जाण्यापूर्वी हे वाचा 

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शासनाचे सर्व नियम पाळ‌ावेत. याबाबत नियमावलीचे फलक लावण्यात आले आहेत. प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य आहे. भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे.  गर्भगृहासमोर लावलेल्या काचेच्या दरवाजापासून दर्शन घ्यावे. सर्वांनी तोंडाला मास्क लाऊनच मंदिरात प्रवेश करावा, भक्तांनी रांग लावताना विशिष्ट अंतर ठेवावे. 

१८ वर्षांखालील भक्तांचे काय? दहा वर्षांच्या आतील व साठ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी प्रवेश नाही. शक्यतोवर कोरोना लसींचे दोन्हीही डोस घेतलेल्यांना प्रवेश राहणार आहे. नियमानुसार दोन व्यक्तींमध्ये तीन मीटरचे अंतर आवश्यक राहील. 

देवीच्या मुखवट्याची शोभायात्राही नाही 

दरवर्षी घटस्थापनेच्या दिवशी संस्थानच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावरून श्री जगदंबा देवीच्या मुखवट्याची वाजतगाजत केळापूरच्या मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येते. ही शोभायात्रा म्हणजे पांढरकवडावासीयांसाठी एक पर्वणी असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही शोभायात्रा काढण्यात येणार नाही.

एकीकडे कोरोनाचे सावट कायम आहे. संस्थानने भाविकांसाठी नियम व अटी घातल्या आहेत. दरवर्षी येथे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदाही तशी तयारी केली जात आहे. यासाठी मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या काळात भाविकांसाठी उद्यान सुरू ठेवण्यात येणार आहे. 

ओटी भरण्याची व्यवस्था मंदिराच्या बाहेर देवीची ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या बाहेर ओटी भरण्याची व्यवस्था केली आहे. मागील वर्षीच्या कोरोना महामारीचा प्रकोप लक्षात घेता भाविकांना दर्शन घेता यावे, म्हणून शासन  आदेशाच्या अधिन राहून नियमावली करण्यात आली आहे.  परिस्थितीनुसार यामध्ये बदल करण्याचे अधिकार संस्थानने आपल्याकडे राखून ठेवले आहेत.  

 

टॅग्स :Navratriनवरात्रीCorona vaccineकोरोनाची लस