शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वीज महावितरण स्वीकारणार २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा

By admin | Updated: November 17, 2016 01:25 IST

महावितरण वीजबिल भरण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक वीज ग्राहकांच्या जुन्या

यवतमाळ : महावितरण वीजबिल भरण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक वीज ग्राहकांच्या जुन्या पाचशे व हजारांच्या नोटा स्वीकारणार आहे. यासाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बिलापोटी स्वीकारण्यात येत आहेत. परंतु आगाऊ (अ‍ॅडव्हान्स) पेमेंट स्वीकारण्यात येणार नाही. वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे, यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह राज्यातील सर्वच केंद्रांवर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करतील. हे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या शिवाय ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.चार दिवसांत पावणेसहा कोटी वीज बिलापोटी यवतमाळ जिल्ह्यात केवळ चार दिवसात पावणेसहा कोटींच्या घरात रक्कम महावितरणकडे आली आहे. वीज बिलापोटी जिल्ह्यात एकूण पाच कोटी ७१ लाख बारा हजार रुपये ११ ते १४ नोव्हेंबर या चार दिवसांमध्ये नागरिकांनी वीज कंपनीकडे भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक दोन कोटी ४० लाख ९७ हजार रुपये यवतमाळ विभागात वसूल झाले. त्या पाठोपाठ पुसद विभागात एक कोटी ९३ लाख ५३ हजार रुपये तर पांढरकवडा विभागात एक कोटी ३६ लाख ६२ हजार रुपयांचा भरणा वीज ग्राहकांनी केला आहे.