शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता खर्‍या अर्थाने प्रकल्पांना गती मिळेल

By admin | Updated: May 17, 2014 02:10 IST

मी यापूर्वी तीनवेळा खासदार होते. मतदारसंघाचा विकास व्हावा हाच ध्यास माझ्या मनात असायचा. परंतु विरोधी पक्षाची खासदार असल्याने केंद्र सरकार आपण प्रस्तावित केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करायचे.

गजानन अक्कलवार - यवतमाळ

मी यापूर्वी तीनवेळा खासदार होते. मतदारसंघाचा विकास व्हावा हाच ध्यास माझ्या मनात असायचा. परंतु विरोधी पक्षाची खासदार असल्याने केंद्र सरकार आपण प्रस्तावित केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे विकासाच्या योजना खेचून आणताना कमालीच्या र्मयादा यायच्या. आता जिल्ह्याच्या विकासपूर्तीचा क्षण जवळ आला आहे. केंद्रात आमचे (एनडीएचे) सरकार स्थापन होणार असल्याने खर्‍या अर्थाने केंद्राचे प्रकल्प यवतमाळ-वाशिम मतदार संघात राबवू, अशी ग्वाही शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी दिली. विजयानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली.

यवतमाळचा रेल्वे प्रकल्प बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित आहे. जनतेचाही हा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे. आता हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गातील काँग्रेसचा अडथळा दूर झाला आहे. येत्या पाच वर्षाच्या कार्यकाळात हा प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा विश्‍वासही गवळी यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने दाखविलेला विश्‍वास, काँग्रेस विरोधी लाट, सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार आणि भगवा फडकविण्याच्या बाळासाहेबांच्या स्वप्नांचा हा विजय असल्याचे त्यांनी मान्य केले. माझ्या विजयाचे श्रेय कोणा एकाला देता येणार नसून ही सामूहिक प्रयत्नाची फलश्रृती असल्याचे भावना गवळी यांनी सांगीतले.

जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तरुण कामाच्या शोधात स्थलांतरित होत आहे. जिल्ह्यातील राजकीय पुढार्‍यांनी बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. टेक्सटाईल पार्क तयार करणे हे आपले स्वप्न आहे. त्यादृष्टीने काही वर्षांंपासून प्रयत्न सुरू आहे. परंतु केंद्रातील सरकारने विरोधी पक्षाची खासदार म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

आता नरेंद्र मोदी यांच्या शासन काळात हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कुठलीही कसर सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. आता मला माझ्यातील क्षमतांचा जनतेच्या विकासासाठी योग्य वापर करता येणार आहे. पुढील पाच वर्षे मतदारसंघासाठी सुवर्णकाळ ठरेल, असे त्या म्हणाल्या.