शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता यवतमाळातच होणार कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर यांनी तात्पुरत्या स्वरूपात अत्यावश्यक परिस्थितीत कोरोना चाचणीला मान्यता दिली आहे. त्यासंदर्भातील आदेश २३ मे रोजी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. शिवाय तपासणीकरिता लागणारे ५० कार्ट्रेज उपलब्ध आहे. या स्वॅब तपासणी प्रक्रियेची गती मंद आहे. दिवसभरात १५ नमुने तपासता येणार आहे.

ठळक मुद्देतरतूद : पूर्णवेळ प्रयोगशाळेला एक आठवड्याचा अवधी

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ११५ वर पोहोचली आहे, तर अ‍ॅक्टिव रूग्ण १७ आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी करण्याला आयूषकडून मान्यता मिळाली आहे. अत्यावश्यक व तातडीने तपासणी करण्यासाठी ही मान्यता दिली आहे. लवकरच येथील कोरोना लॅब पूर्णत्वास येणार आहे. त्यानंतर सर्वच रुग्णांचे स्वॅब येथे तपासले जातील.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर यांनी तात्पुरत्या स्वरूपात अत्यावश्यक परिस्थितीत कोरोना चाचणीला मान्यता दिली आहे. त्यासंदर्भातील आदेश २३ मे रोजी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. शिवाय तपासणीकरिता लागणारे ५० कार्ट्रेज उपलब्ध आहे. या स्वॅब तपासणी प्रक्रियेची गती मंद आहे. दिवसभरात १५ नमुने तपासता येणार आहे. सध्या नागपूर एम्समध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीला पाठविले जात आहे. मध्यंतरी अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे स्वॅब तपासणीला पाठविले जात होते. तूर्त आता १५ नमुने दिवसातून तपासण्यासाठी एम्सचे मायक्रोबॉयलॉजी विभाग प्रमुख डॉ. मीना मिश्रा यांनी मान्यता दिली आहे.मशिनरी पोहोचली, इन्स्टॉलेशन बाकीयवतमाळात कोविडची तपासणी लॅब तयार व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच सिंगापूर येथून कोविड लॅबसाठी लागणारी मशिनरी पोहोचली आहे. कोल्डसेंट्रिफ्यूज येणे बाकी आहे. ते आल्यानंतर पुढील आठवड्यात मशिनरी इन्स्टॉल करून कोविड लॅब सुरू होण्याची शक्यता आहे.आयसोलेशनमध्ये ३१ जणवसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सध्या १७ कोरोनाबाधित रुग्णांसह ३१ जण दाखल आहेत. त्यापैकी १४ प्रिझम्टिव्ह केसेस असल्याचे मेडिकल प्रशासनाने कळविले. रविवारी चार जण आयसोलेशन वॉर्डात भरती झाले. तर १८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ११५ तर सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७ आहे. दरम्यान यवतमाळात ९६ जण पूर्णत: बरे झाले. तर मूळ यवतमाळातील दोघे पुणे आणि मुंबई येथून ठणठणीत झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या