शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
3
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
4
लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांना पॅरोल मिळणं बंद होणार; पण कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते?
5
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
6
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
7
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
8
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
9
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
10
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
11
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
12
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
13
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
14
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
15
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
16
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
17
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
18
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
19
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

नेरची सून झाली महाराष्ट्राची स्वच्छतादूत

By admin | Updated: October 4, 2015 00:23 IST

स्वच्छता हा स्वभावाचा भाग आहे. स्वच्छतेची सवय स्वीकारली, तर सामान्य माणूसही असामान्य बनतो.

आंदणात घेतले शौचालय : पंतप्रधानांच्या हस्ते होणार चैतालीचा सन्मानकिशोर वंजारी नेरस्वच्छता हा स्वभावाचा भाग आहे. स्वच्छतेची सवय स्वीकारली, तर सामान्य माणूसही असामान्य बनतो. याचे उदाहरण दूर नव्हे आपल्या शेजारीच आहे. नेरची सून चैताली. लग्नात तिने आपल्या वडिलांना सर्व वस्तू टाळून शौचालयच मागितले. तिच्या स्वच्छतेच्या ध्यासाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली अन् आज ती महाराष्ट्राची स्वच्छतादूत बनली!अकोला जिल्ह्यातील कारंजा रमजानपूर (ता. बाळपूर) हे छोटेसे गाव चैतालीचे माहेर. वडील दिलीप वासूदेव राठोड हे आसपासच्या गावात मसाला सुपारी विकून संसार चालवितात. एक मुलगी अन् एक मुलगा हा त्यांचा परिवार. घरात गरिबी असली तरी मुलांना त्यांनी स्वच्छतेची शिस्त लावली. चैताली बारावीपर्यंत शिकली. पुढेही शिकण्याची ईच्छा होतीच. पण परिस्थितीने अडविले. नेर तालुक्यातील मोझर येथील देवेंद्र उत्तमराव माकोडे हे स्थळ चैतालीकडे विवाहासाठी आले होते. देवेंद्रची परिस्थितीही हलाखीचीच. तो लहान असतानाच वडील वारले. गावातच फोटोग्राफीचा व्यवसाय करून तो आईसह कसाबसा उपजीविका करायचा. घरी शौचालय बांधण्याची ईच्छा असूनही बांधू शकला नाही. देवेंद्र आणि चैतालीचा विवाह जुळल्यावर त्यांनी फोनवर एकमेकांचे सुख-दु:ख जाणून घेतले. त्यातूनच आपल्या सासरी शौचालय नसल्याचे चैतालीला कळले. देवेंद्रनेही लग्नानंतर दोन-तीन महिन्यात शौचालय बांधण्याची ग्वाही दिली. पण चैतालीला ते पटले नाही. तिने आपल्या वडिलांना लग्नाच्या आंदणात शौचालयच देण्याची विनंती केली. १५ मे २०१५ रोजी विवाह होता. वडिलांनी चैतालीसाठी रेडीमेड शौचालय आणून दिले. या आगळ्या आंदणाची दखल प्रसिद्धी माध्यमांनीही घेतली अन् चैतालीची कीर्ती दिल्लीच्या सुलभ इंटरनॅशनल संस्थेपर्यंत पोहोचली. या संस्थेचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी चैतालीला १० लाखांचा पुरस्कार घोषित केला. चैतालीला दिल्ली येथे बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.शुक्रवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चैतालीला सन्मानित करण्यात आले. शासनाने महाराष्ट्राची स्वच्छता दूत म्हणून आता चैतालीची निवड केली आहे. अकोल्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनीही तिला सन्मानित केले.