शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

काम होण्यापूर्वीच उखडला राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देदिग्रस-दारव्हा-कारंजा : जागोजागी पडले खड्डे, कामाच्या दर्जावर शंका, पावसाने उघड केली कामाची गुणवत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : बहुप्रतीक्षित दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. कामाच्या विलंबामुळे नाराजी आहे. आता काम झालेल्या ठिकाणचा काही भाग उखडण्यास सुरूवात झाली. यामुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे. नोव्हेंबर २०१५ ला पूर्वीच्या २८२ क्रमांकाच्या यवतमाळ-कारंजा राज्य मार्गाला दिग्रस-दारव्हा-कारंजा नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. नंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने ७० किलोमीटर काँक्रीटीकरणासाठी ७०० कोटी रुपये मंजूर केले.मार्च २०१८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर मार्गाच्या बांधकामाला सुरुवात झाली. त्यावेळी संपूर्ण रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची चर्चा असताना मात्र बांधकाम कंत्राटदार कंपनीने खोदकाम करुन केवळ डांबरीकरण सुरू केले. यावरुन शिवसेनेने रस्त्यावर नांगर फिरवून आंदोलनही केले होते. संपूर्ण महामार्गाचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी केली होती. मात्र त्याउपरही जवळपास निम्म्या मार्गावर डांबरीकरण तर निम्म्या मार्गावर काँक्रीटीकरण केले जात आहे.दरयान, डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर आत्तापासूनच खड्डे पडायला सुरूवात झाली आहे. तसेच काँक्रीटीकरणाच्या दर्जावरही शंका उपस्थित केली जात आहे. स्थानिक पातळीवर या मार्गाच्या कामाचे अंदाजपत्रक, आराखडा उपलब्ध होऊ शकला नाही. कोणत्याही मार्गाचा आराखडा त्या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता तयार केला जातो. त्यात राष्ट्रीय महामार्गाचे स्टेटस जास्त असल्याने मजबुतीवर जास्त लक्ष दिले जाते. मात्र या राष्ट्रीय महामार्गाची कामाच्या चालू स्थितीतच दुरवस्था होत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा महामार्ग मजबूत व टिकावू होण्यासाठी अंदाजपत्रकानुसार काम होणे आवश्यक आहे.गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी कुणाचीकोट्यवधी रुपये खर्चून हा महामार्ग बांधला जात आहे. मात्र कामाच्या दर्जाबद्दल सतत तक्रारी होत आहे. असुविधेमुळे तीन वर्षांपासून वाहनधारक त्रस्त आहे. मात्र याविरुद्ध कुणीही आवाज उठवायला तयार नाही. लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, विरोधक सर्वच गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारीसुद्धा कामाचा आढावा घेताना दिसत नाही. त्यामुळे गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग