दारूड्या तरूण मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:20+5:30

पोलीस पाटील नामदेव तोरकड यांनी या घटनेची महागाव पोलीस ठाण्याला आणि रामदासच्या पत्नीला दिली. महागाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेतील संशयित आरोपी भीमराव लक्ष्मण रणमले (वय ७०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान रामदासच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भीमराव विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

Murder of a drunken young boy | दारूड्या तरूण मुलाचा खून

दारूड्या तरूण मुलाचा खून

ठळक मुद्देवृद्ध पित्याला अटक : आईची फिर्याद, महागाव ठाणे

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : दारू पिऊन दररोज घरी वाद घालणाऱ्या मुलाला पित्यानेच ठार मारल्याची घटना तालुक्यातील मलकापूर (चिखली) येथे सोमवारी रात्री ११.३० वाजता घडली. रामदास भीमराव रणमले (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रामदास नेहमीप्रमाणे सोमवारी मद्यधुंद अवस्थेत घरी आला. क्षुल्लक विषयावरून वडिलांसोबत वाद घालून त्याने जोरदार भांडण केले. त्यात वडिलांनी केलेल्या हाणामारीत तो अत्यंत गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुसद येथे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पोलीस पाटील नामदेव तोरकड यांनी या घटनेची महागाव पोलीस ठाण्याला आणि रामदासच्या पत्नीला दिली. महागाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेतील संशयित आरोपी भीमराव लक्ष्मण रणमले (वय ७०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान रामदासच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भीमराव विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. रामदास हा विवाहित असून पती-पत्नीत वाद असल्याने त्याची पत्नी मागील दीड वर्षापासून पत्नी माहेरी राहत आहे. या मद्यपी मुलाचा कुटुंबालाच त्रास होता. दारूमुळे घरात सातत्याने भांडणे होत होती. अखेर त्याचे पर्यवसान खुनात झाले.

घरगुती वादात ही घटना घडली आहे. यातील आरोपी मृताचे वडील भीमराव रणमले यांना आम्ही ताब्यात घेतले आहे. यामध्ये मृतांच्या आईचे बयाण नोंदविले.
- दामोदर राठोड,
ठाणेदार, महागाव.

Web Title: Murder of a drunken young boy

टॅग्स :Murderखून