शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर मोझॅक किडींचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 6, 2014 23:20 IST

कपाशी पिकांवर लाल्या, तर सोयाबीन पिकांवर मोझॅक किडीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी उत्पन्नात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे.

बोटोणी : कपाशी पिकांवर लाल्या, तर सोयाबीन पिकांवर मोझॅक किडीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी उत्पन्नात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे. जिल्ह्यात मारेगाव तालुका कापूस व सोयाबीनचे नगदी पीक घेणारा तालुका म्हणून ओळखला जातो. यावर्षी खरीपाच्या सुरूवातीच्या काळात कमी पाऊस व जास्त तापमान होते़ जून, जुलैमध्ये अत्यल्प पाऊस पडला, तरी शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज, सावकारी कर्ज घेऊन शेतात कशीबशी पेरणी केली़ मात्र नंतर पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली़ रासायनिक खतांचा तुटवडा, महागड्या कीटकनाशकांची फवारणी करून शेतकरी मेटाकुटीस आले असताना आॅगस्ट, सप्टेंबरमधील पावसाने शेतकऱ्यांना धीर मिळाला़सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील दमदार पावसाने पर्यावरणात बदल झाला़ परिणामी कापूस व सोयाबीन पिकावर आता विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला़ आहे. आता पाऊस पुन्हा बेपत्ता झाल्यागत आहे़ या महिन्याच्या प्रारंभी मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे त्यांची कपाशी पाण्यात बुडाली़ परिणामी कपाशीची पाने गळून लाल्या रोगाचे आक्रमण झाले. त्यामुळे कपाशीचा रंग आता लालसर दिसू लागला आहे़ मारेगाव तालुक्यात यावर्षी बीटी बियाण्यांचा पेरा अधिक आहे. त्यातही अनेक शेतकऱ्याच्या कपाशीवर लाल्याने आक्रमण केल्याचे आढळले आहे. तालुक्यात ५० टक्के क्षेत्र सोयाबिनने व्यापले आहे़ यावर्षी कमीअधिक प्रमाणात सोयाबिनवरही मोझॅक व पिवळा मोझॅक आल्याचे शेतकरी सांगत आहेत. कृषी विभागाला तशी माहिती देण्यात आली. आता झाडांची वाढ खुंटलेली आहे. सोयाबिनला शेंगाही कमी प्रमाणात लागल्या आहेत़ झाडांचा रंग पिवळसर दिसून येत आहे़ त्यामुळे सोयाबीन उत्पन्नात घट येण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकीडे असल्यास १० लीटर पाण्यात १०० ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट फवारावे, पांढरी माशी असल्यास मोनोस्टोफोस मिथेल डेमॉडाल किंवा १० लीटर पाण्यात १० मिली ३० टक्के प्रवाहीत रोगर औषध फवारावे़ सोयाबिनवर मोझॅक कीड असल्यास झाडे समूळ उपटून नष्ट करावी. तसेच डायमेथोएट ३० टक्के प्रवाही किंवा मिथील केमेटॉन २५ टक्के प्रवाही १० मिली १० लीटर पाण्यात फवारावे व शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. (वार्ताहर)