शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची आवक वाढल्याने बाजार समित्या ‘हाऊसफुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

शासनाने सोयाबीनचे हमीकेंद्र सुरू करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. हंगाम संपल्यानंतरही हमीकेंद्र उघडले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी हमीकेंद्राची प्रतीक्षा न करता आपला शेतमाल खुल्या बाजारात नेण्यास प्रारंभ केला आहे. सोयाबीनच्या नुकसानीमुळे खुल्या बाजारात दरात सुधारणा होत आहे. २८०० रुपयांपासून ३७०० रूपये क्विंटलपर्यंत सोयाबीनची खरेदी केली जात आहे.

ठळक मुद्देऑनलाईन नोंदणीत घट : शेतकऱ्यांना ठोकावा लागतोय मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने सोयाबीनला ३७१० रूपये क्विंटलचा हमीदर जाहीर केला आहे. तरी हमीकेंद्र अजूनही सुरू केले नाही. याच सुमारास खुल्या बाजारात सोयाबीनचे दर मात्र सुधारण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे बाजार समित्या हाऊसफुल्ल झाल्या आहे. शेतकऱ्यांना अक्षरश: तेथेच मुक्काम ठोकावा लागत आहे.शासनाने सोयाबीनचे हमीकेंद्र सुरू करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. हंगाम संपल्यानंतरही हमीकेंद्र उघडले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी हमीकेंद्राची प्रतीक्षा न करता आपला शेतमाल खुल्या बाजारात नेण्यास प्रारंभ केला आहे. सोयाबीनच्या नुकसानीमुळे खुल्या बाजारात दरात सुधारणा होत आहे. २८०० रुपयांपासून ३७०० रूपये क्विंटलपर्यंत सोयाबीनची खरेदी केली जात आहे. लगतच्या हिंगणघाट आणि कारंजा बाजारपेठेत हे दर ३७४० रूपये क्विंटलपर्यंत पोहचले आहे. हे दर हमीदरापेक्षा ३० रूपयांनी अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा बाजार समितीकडे वळविला आहे. यातून बाजार समित्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी मात्र थांबली आहे. मार्केटिंग फेडरेशनला आतापर्यंत केवळ १२३ नोंदणी आल्या आहेत. यावरून शेतकऱ्यांनी हमीकेंद्राकडे पाठ फिरविल्याचेच स्पष्ट होत आहे.खुल्या बाजारातील दरात सुधारणागतवर्षी शेतकऱ्यांनी हमीकेंद्राकडे सोयाबीन आणले. त्याचवेळी खुल्या बाजारात सोयाबीनचे दर चढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन परत द्या, अशी मागणी मार्केटिंग फेडरेशनला केली होती. यावर्षी हमी केंद्रच उघडले नाही. खुल्या बाजारातील भावही हमीदराच्या बरोबरीत पोहचले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी हमी केंद्रात नोंदणी केली तरी सोयाबीन पाठविले नाही. खुल्या बाजारातील दरात अशीच सुधारणा होत राहिल्यास पुढील काळात हमी केंद्र उघडले तरी सोयाबीन जाण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड