शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवाच्या गर्दीने बाजारपेठेला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

शहरातील खाचखळगे, रस्त्यांचे बांधकाम या सर्व अडचणी पार करीत भक्तांनी संपूर्ण शहर पायदळ तुडविले. मातेचे दर्शन घेतले. वडगाव ते गांधी चौक आणि माळीपुरा ते विश्वासनगरपर्यंतचा परिसर आणि लोहारापर्यंत भक्त गर्दी करीत आहेत. परगावातील अनेक जण सामूहिकरित्या वाहन करून आले. वाहनांचे ताफे रस्त्यांच्या दुतर्फा रात्रभर उभे राहत आहे.

ठळक मुद्देदिन दुगनी रात चौगुनी खरेदी : रात्रभर रस्त्यांवर चहलपहल, वाहनांची तोबा गर्दी

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव पाहण्यासाठी भक्त यवतमाळात अलोट गर्दी करीत आहे. या गर्दीने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. रात्रभर रस्त्यांवर प्रचंड वर्दळ पहायला मिळत आहे. यातून शहराच्या अर्थव्यवस्थेत भर पडली आहे.शहरातील खाचखळगे, रस्त्यांचे बांधकाम या सर्व अडचणी पार करीत भक्तांनी संपूर्ण शहर पायदळ तुडविले. मातेचे दर्शन घेतले. वडगाव ते गांधी चौक आणि माळीपुरा ते विश्वासनगरपर्यंतचा परिसर आणि लोहारापर्यंत भक्त गर्दी करीत आहेत.परगावातील अनेक जण सामूहिकरित्या वाहन करून आले. वाहनांचे ताफे रस्त्यांच्या दुतर्फा रात्रभर उभे राहत आहे. अख्खी रात्र पालथी घातल्यानंतर दिवस कधी उगवला याचे भान भक्तांना राहत नाही. काही मंडळांपुढे तर मध्यरात्रीनंतरही दर्शनासाठी रांगा असतात. ही संपूर्ण गर्दी कुठली ना कुठली वस्तू खरेदी करते. यामुळे बाजारपेठेतील दुकाने रात्रीही उघडी असतात. यातून बाजारपेठेची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छोट्या व्यावसायिकांनाही मोठा रोजगार या कालावधीत मिळाला. अन्नदान असले तरी उपवास साहित्य आणि इतर खाद्यपदार्थांच्या दुकानावर वर्दळआहे.जल चढविण्यासाठी मध्यरात्रीपासूनच रांगाशितला मातेला जल चढविण्यासाठी महिलांच्या रांगा लागतात. नवरात्र उत्सवात शितला मातेची आराधना पावन असल्याचे मानले जाते. यामुळे मध्यरात्रीपासूनच महिला भाविकांच्या रांगा पहायला मिळतात.वाहतूक व्यवसायात सर्वाधिक उलाढालगावखेड्यांतून राज्य परिवहन महामंडळाच्या बस, खासगी वाहने, टेम्पो ट्रॅक्समध्ये बसून भाविक यवतमाळात येत आहे. यामुळे वाहतूकदारांना अधिकचा रोजगार उपलब्ध झाला आहे. दुचाकी वाहनांची वर्दळही वाढली आहे. यातून पेट्रोल आणि डिझेलची उचलही वाढली आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री