शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांवर प्रेशर कायम ठेवा

By admin | Updated: March 9, 2017 00:18 IST

जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगावरांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यमातून प्रेशर कायम ठेवा,

एसपींचे निर्देश : प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याच्या सूचना यवतमाळ : जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगावरांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यमातून प्रेशर कायम ठेवा, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी मंगळवारी क्राईम मिटींगमध्ये सर्व ठाणेदारांना दिले. कोणत्याही स्थितीत अवैध धंदे सुरू राहता कामा नये, अशी तंबी त्यांनी दिली. याशिवाय सक्रिय गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तडीपार व एमपीडीएचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी अडीच वाजता संपली. निवडणूक बंदोबस्तानंतरची ही दुसरी क्राईम मिटींग होती. या बैठकीत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस प्रशासन कोणत्या दिशेने काम करणार, याचे स्पष्ट निर्देश सर्व अधिकाऱ्यांना दिले. कसे आणि कोणत्या पद्धतीने अवैध धंदे बंद करायचे, ते तुम्ही ठरवा. मला केवळ रिझल्ट दिसला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. अवैध व्यावसायीकांवर प्रेशर कायम ठेवा, जेणेकरून कोणत्याही स्थितीतत हे धंदे सुरू राहणार नाही, असे त्यांनी ठाणेदारांना निक्षूण सांगितले. होळी आणि शिवजयंती, या दोन प्रमुख सण, उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष दक्षात घेण्याची सूचना त्यांनी केली. ठाण्यात पेडींग असलेले गुन्हे त्वरित निकाली काढावे, दाखल गुन्ह्याचा वेळेत तपास करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातून गुटखा, अवैध दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. त्यांच्याविरूद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी विविध सूचना केल्या. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांच्यासह सर्व ठाणेदार उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)