डिजिटल ग्रीन पार्क शाळेत आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:31+5:30

पहिली ते आठवीपर्यंत ७० विद्यार्थी असले तरी त्यांनी केजी-१ पासून प्रवेश सुरू करून आणखी ३० विद्यार्थी संख्या वाढविली आहे. तंत्रस्नेही, ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती सर्वात आधी अवलंबून या शाळेने शासनाच्या शाळासिद्धी उपक्रमातही पहिल्याच दणक्यात अ श्रेणी प्राप्त केली आहे.

Lessons for International Education at Digital Green Park School | डिजिटल ग्रीन पार्क शाळेत आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे धडे

डिजिटल ग्रीन पार्क शाळेत आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे धडे

Next
ठळक मुद्देयवतमाळ नगरपालिकेची प्रगत शाळा : आयएसओ मानांकन मिळविणारी विदर्भातील पहिली नगरपालिका शाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खासगी शाळांच्या वावटळीत शहरातील नगरपालिकेच्या शाळा ओस पडत असताना यवतमाळ नगरपालिकेच्या १८ क्रमांकाच्या शाळेने मात्र कालानारुप बदल स्वीकारत डीजिटल ग्रीन पार्क स्कूल अशी ओळख मिळविली आहे. येथील तंत्रस्नेही शिक्षक संजय चुनारकर यांच्या धडपडीतून हा बदल घडला आहे.
पहिली ते आठवीपर्यंत ७० विद्यार्थी असले तरी त्यांनी केजी-१ पासून प्रवेश सुरू करून आणखी ३० विद्यार्थी संख्या वाढविली आहे. तंत्रस्नेही, ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती सर्वात आधी अवलंबून या शाळेने शासनाच्या शाळासिद्धी उपक्रमातही पहिल्याच दणक्यात अ श्रेणी प्राप्त केली आहे. तर सातत्याने भौतिक सोईसुविधांमध्ये लोकसहभागातून आणि पालिका प्रशासनाच्या सहकार्याने वाढ केली. या सर्वांच्या पाठबळावर संजय चुनारकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शाळेला आयएसओ मानांकन मिळाले. विशेष म्हणजे अशा प्रकारचे मानांकन मिळविणारी ही विदर्भातील पहिली शाळा ठरली.
या शाळेला आतापर्यंत जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी भेटी देऊन येथील उपक्रमांची पाहणी केली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणात ज्या दहा बाबी समाविष्ठ आहे. त्याचा परिपूर्ण अवलंब या शाळेत केला जात आहे. मुख्याध्यापिका ज्योती सावळकर, तंत्रस्नेही शिक्षक संजय चुनारकर, धर्मा पवार, शीतल बागडे यांनी विविध उपक्रमांसह पालकांच्या सातत्यपूर्ण भेटीतून शाळेचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Lessons for International Education at Digital Green Park School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा