गॅस कटरने एटीएम फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 05:00 AM2021-10-14T05:00:00+5:302021-10-14T05:00:07+5:30

२ ऑक्टोबरला एटीएम फोडल्याची घटना घडल्यानंतर राळेगाव पोलीस व एलसीबीचे पथक कामाला लागले. एलसीबीचे पथकाने शंभर किलोमीटर परिसरातील दुकाने, खासगी निवासस्थान, टोल प्लाझा येथील सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले. त्यात एक कार क्र.एचआर-५१-बीवाय-४०९६ संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. दरम्यान कळंब पोलीस ठाण्यात ऑक्सिजन सिलिंडर चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली. त्यातही त्याच कारचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या कारचा माग काढणे सुरू केले.

The leader of the gang who blew up the ATM with a gas cutter was arrested | गॅस कटरने एटीएम फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद

गॅस कटरने एटीएम फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राळेगाव येथील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडून त्यातून आठ लाख ६९ हजार रुपयांची रोख लंपास केली. ही घटना २ ऑक्टोबरला घडली होती. आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला थेट हरियाणातून रोख रकमेसह पोलिसांनी अटक केली. इतर चार आरोपी पसार झाले आहे. 
लियाकत अली दिनमोहंमद (४०) रा. पिनगाव ता. पुन्हाना, जि. मुंह, राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या मास्टर माईंडचे नाव आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा व राजस्थान या तीन राज्यांत आरोपींचा कसोशीने शोध घेण्यात आला. मात्र उर्वरित सदस्य पसार होण्यात यशस्वी झाले. 
असा लागला सुगावा 
२ ऑक्टोबरला एटीएम फोडल्याची घटना घडल्यानंतर राळेगाव पोलीस व एलसीबीचे पथक कामाला लागले. एलसीबीचे पथकाने शंभर किलोमीटर परिसरातील दुकाने, खासगी निवासस्थान, टोल प्लाझा येथील सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले. त्यात एक कार क्र.एचआर-५१-बीवाय-४०९६ संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. दरम्यान कळंब पोलीस ठाण्यात ऑक्सिजन सिलिंडर चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली. त्यातही त्याच कारचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या कारचा माग काढणे सुरू केले.  तांत्रिक माहितीच्या सहाय्याने ती कार व चोरी करणारी टोळी हरियाणा राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी थेट टोल नाक्याचे फुटेज तपासात हरियाणा राज्य गाठले. त्यापूर्वी उत्तर प्रदेश, राजस्थान येथेही आरेापींचा शोध घेतला. त्यातून या टोळीतील मास्टर माईंडला हरियाण पोलिसांच्या मदतीने अटक केली. या टोळीने विविध राज्यामध्ये एटीएम फोडण्याचे गुन्हे केले आहेत. आरोपीकडून रोख एक लाख ५० हजार रोखेसह ११ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एलसीबीचे निरीक्षक प्रदीप परदेशी, राळेगाव ठाणेदार संजय चौबे, सहायक निरीक्षक अमोल मुडे, गणेश वानरे, उपनिरीक्षक भगवान पायघन, योगेश रंधे, जमादार गोपाल वास्टर, बबलू चव्हाण, सलमान शेख, सुधीर पिदूरकर, सायबर सेलचे सहायक निरीक्षक अमोल पुरी, पंकज गिरी, रोशनी जोगळेकर यांनी ही कारवाई केली. 
तपास पथकाला बक्षीस 
- उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तपास पथकाला ५० हजारांचे रोख बक्षीस, अधिकाऱ्यांना सीनोट्स तर कर्मचाऱ्यांना गुड रिमार्क देण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी एटीएम संदर्भाने झालेल्या दोन्ही गुन्ह्यांच्या कामगिरीबाबत सायबर सेल व इतर पथकांचे कौतुक केले.

 

Web Title: The leader of the gang who blew up the ATM with a gas cutter was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.