शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: October 6, 2014 23:20 IST

काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे़ पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत

नांदेपेरा : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे़ पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. दुसरीकडे महावितरण त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे.विजेच्या दररोजच्या लपाछपीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मुद्दाम शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे डोळेझाक करीत आहे़ या परिसरात कर्मचाऱ्यांकडे काम अधिक आणि कर्मचारी कमी, अशी अवस्था आहे़ यामुळे कृषी पंपांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण होत नाही़ त्यामुळे बहुतांश शेतकरी खासगी कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घेतात़ त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो़ नांदेपेरा परिसरातील ट्रान्सफार्मर (कृषी पंप) बंद पडले आहे़ त्यामुळे शेतातील पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ या परिसरात विज पुरवठ्यात नेहमी तांत्रिक बिघाड होत असतो. तरीही लाईनमनला जाग येत नाही़ त्यांच्याकडे अनेक गावांचा प्रभार असल्यामुळे शेतकरी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधतो. त्यांना साहेब तुम्ही केव्हा येता, अशी विचारणा करतात़ परंतु लाईनमन साहेब कधी या गावी, तर कधी त्या गावी असतात़ लाईनमन एक अन् गाव अनेक अशी स्थिती आहे. त्यातच तक्रारींची संख्या वाढत आहे. यामुळे एकाही तक्रारीचे धड निराकरण होत येत नाही़ या परिसरात विद्युत पुरवठा वारंवार बंद राहत असल्याने पिकांचे ओलित होत नाही. परिणामी आर्थिक भुर्दंड तर पडतोच, पण शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते़ ही समस्या निकाली काढण्याकरिता वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)