शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

महागावातील कोविड केंद्र समस्यांग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

या केंद्रात रुग्णांची सेवा करणे आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे. मात्र केंद्रातील नागरिकांना ‘कोरोनाग्रस्तांनी असा कोणता तीर मारला, की आम्ही त्यांची सेवा करावी, जे मिळते त्यात समाधान माना, स्वत: आत्मनिर्भर राहा, असा सल्ला आरोग्य यंत्रणा देत आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचाराची काय स्थिती असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. या केंद्रात पिण्याच्या पाण्याच्या व शौचालयातही पाण्याचा अभाव आहे.

ठळक मुद्देअनेक असुविधा : जेवणाचा दर्जा सुमार, क्वारंटाईन नागरिक त्रस्त, समाधान मानण्याचा सल्ला

ज्ञानेश्वर ठाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : येथील शासकीय निवासी विद्यालयात कोविड केंद्राची निर्मिती करण्यात आली. तेथे सध्या अनेक नागरिक क्वारंटाईन आहे. मात्र हे केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले असून क्वारंटाईन नागरिक त्रस्त आहे.या केंद्रात रुग्णांची सेवा करणे आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे. मात्र केंद्रातील नागरिकांना ‘कोरोनाग्रस्तांनी असा कोणता तीर मारला, की आम्ही त्यांची सेवा करावी, जे मिळते त्यात समाधान माना, स्वत: आत्मनिर्भर राहा, असा सल्ला आरोग्य यंत्रणा देत आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचाराची काय स्थिती असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. या केंद्रात पिण्याच्या पाण्याच्या व शौचालयातही पाण्याचा अभाव आहे. केंद्रात दाखल रुग्णांची कोणतीच सोय होत नसल्याची ओरड काहींनी केली.कोरोनाने मृत्यू येईल तेव्हा येईल, परंतु अवेळी भोजन, पिण्याच्या पाण्यासह वापरण्याचे पाणी नसल्याने आम्ही या समस्येमुळे मरू शकतो, अशी भीती तेथील क्वारंटाईन नागरिकांनी व्यक्त केली. या केंद्रात रात्रीचे जेवण ११ वाजता मिळाले. त्यातही जेवणाचा दर्जा सुमार होता. दुसऱ्या दिवशी चहा मिळाला नाही. सकाळचे जेवण चक्क दुपारी ३ वाजता मिळाले. वापरण्याच्या पाण्याचा अभाव आहे. अशा विविध समस्येत क्वारंटाईन वावरत आहे. ‘लोकमत’ने ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे मात्र गुरुवारी त्यांना रात्रीचे जेवण वेळेत मिळाले.कोविड सेंटरमधील नागरिकांना जेवण देण्यास कुणीही तयार नाही. ज्यांना जेवणाचे डबे द्यावयाचे आहे, त्यांच्या शोधात आम्ही आहोत. त्यांच्याशी करार करून व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. वाढते रुग्ण बघता थोड्याफार समस्या उद्भवणारच आहेत.- नीलेश मडके,तहसीलदार महागाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या