शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या त्रिकोणात कळंब पोलिसांची दमछाक

By admin | Updated: November 2, 2016 00:58 IST

लग्नाची पत्नी व एक मुलगी असतानाही नवऱ्याचे एका तरुणीशी सूत जुळले. प्रेमाच्या या त्रिकोणातील पती, पत्नी आणि ‘ती’

ठाण्यात गोंधळ : पत्नीला सोडून प्रेयसीसोबत विवाह करण्यास निघालेल्या पतीची ठाण्यातच धुलाईगजानन अक्कलवार  कळंबलग्नाची पत्नी व एक मुलगी असतानाही नवऱ्याचे एका तरुणीशी सूत जुळले. प्रेमाच्या या त्रिकोणातील पती, पत्नी आणि ‘ती’ चक्क पोलीस ठाण्यात धडकले. तिघांचाही ठाण्यातच गोंधळ सुरू झाला. या तिघांनाही शांत करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. हा प्रकार पाहण्यासाठी ठाण्यात मोठी गर्दी उसळली होती.येथील माथा वस्तीतील युवकाचा धामणगाव येथील तरुणीशी विवाह झाला. त्यांच्या संसारवेलीवर एक कळी फुलली. काही दिवसानंतर या युवकाचे गावातीलच एका तरुणीशी सूत जुळले. याच कारणावरुन त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. या त्राग्याला कंटाळून तिने माहेरचा रस्ता धरला. पत्नी माहेरी गेल्याची चांगलीच संधी त्याने साधली. प्रेयसीसोबत लग्न करायला तो निघाला. ही माहिती होताच पत्नीने भाऊ, वडील, आई , काका आणि नातेवाईकांना घेऊन कळंब गाठले. युवकाने पे्रयसीसोबत ठाणे गाठले. याठिकाणी पत्नीने पती व प्रेयसीची पोलिसांसमक्ष यथेच्छ धुलाई केली. पतीविरोधात तक्रारही दाखल केली. काही वेळात प्रेयसीचे नातेवाईकही ठाण्यात धडकले. त्यांनी तिला घरी चालण्याची विनंती केली. परंतु ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. प्रियकराला सोडून कुठेही जाणार नाही, या भूमिकेवर ती ठाम होती तर, दुसरीकडे पत्नीही पतीला माझ्या स्वाधीन करण्याची विनंती पोलिसांना करीत होती. वेगवगेळ्या तऱ्हेने ती आपला संताप व्यक्त करीत होती. जवळपास दोन तास हा ड्रामा पोलीस ठाण्याच्या आवारात सुरु होता. पत्नीने नातेवाईकांसोबत माथा वस्तीतील घराचे कुलूप तोडले. घरातील सर्व साहित्य गाडीमध्ये भरुन धामणगावला नेण्यात आले. दरम्यान, येथे पत्नीचे नातेवाईक व पतीच्या नातेवाईकांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. एकमेकांना मारहाण झाली. एकदुसऱ्यांची डोकी फोडण्यात आली. हा प्रकार चिघळत असल्याचे लक्षात येताच सहायक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली. नातेवाईकांना धामणगावकडे रवाना करण्यात आले. चार तासानंतर कुठे हे प्रकरण शांत झाले. दुसरीकडे विवाहित युवक व पे्रयसी फरार झाले. त्यांच्या शोधार्थ आता प्रेयसी व पत्नीचे कुटुंबही रवाना झाले.