शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुका उधारीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोग प्रत्येक हालचालीवर बारिक लक्ष ठेऊन आहे. या कामाला गती मिळावी, निवडणुकीच्या कामात सुलभता यावी, मतदानाची प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत व्हावी म्हणून विविध उपाययोजना निवडणूक विभागाने केली आहे. त्याकरिता फार मोठा खर्च येतो.

ठळक मुद्देहात पसरविण्याची वेळ : लोकसभेचे चार तर विधानसभेचे सात कोटी मिळालेच नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभेची निवडणूक जिल्ह्यात पार पडणार आहेत. त्याकरिता ३६ कोटींचा निधी लागणार असला तरी प्रत्यक्षात २५ कोटीच जिल्ह्याला मिळाले आहेत. उर्वरित ११ कोटींचा निधी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. यामुळे विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रशासनावर उधारीत कामे काढून घेण्याच्या दृष्टीने हात पसरविण्याची अथवा हात जोडण्याची वेळ आली आहे.विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोग प्रत्येक हालचालीवर बारिक लक्ष ठेऊन आहे. या कामाला गती मिळावी, निवडणुकीच्या कामात सुलभता यावी, मतदानाची प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत व्हावी म्हणून विविध उपाययोजना निवडणूक विभागाने केली आहे. त्याकरिता फार मोठा खर्च येतो. साधारणत: लोकसभेत सात विधानसभा क्षेत्रासाठी अडीच कोटी रूपयांचा खर्च येतो. तर विधानसभेसाठी एका विधानसभा क्षेत्रात दोन कोटी ७० लाख रूपयांचा खर्च लागतो. यानुसार लोकसभेला १८ कोटी रूपंयांचे बजेट जिल्हा निवडणूक विभागाने सादर केले.प्रत्यक्षात १४ कोटींचे बजेट मंजूर झाले. इतर चार कोटींचा निधी अद्यापही निवडणूक विभागाला मिळाला नाही. यामुळे निवडणूक विभाग चांगलाच अडचणीत सापडला आहे. चार कोटींच्या निधीची प्रतीक्षा असताना विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी १८ कोटींचा निधी लागण्याची अंदाज आहे. असे असतानाही निवडणूक विभागाला केवळ ११ कोटींचा निधी पाठविण्यात आला. एकूण सात कोटींचा निधी अद्यापही बाकी आहे. ११ कोटींचे काम निधी येईपर्यंत उधारीवरच करावी लागणार आहे.वेतन खर्च तीन कोटी ९० लाखनिवडणूक काळात पूर्ण वेळ काम करणाऱ्या एसडीओ, तहसीलदारांना मूळ वेतनाच्या १०० टक्के तर इतर कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या ५० टक्के अतिरिक्त वेतन दिले जाते. तासाप्रमाणेही वेतनाची तरतूद असून त्याची मर्यादा २१० तास आहे. या वेतनाचे बजेट सुमारे चार कोटी आहे.२०१४ चा निवडणूक निधी मिळाला तीन वर्षांनी२०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकांचा निधी असाच प्रलंबित होता. हा निधी २०१७ मध्ये जिल्ह्यात पोहचला. त्यावेळी अधिकारी आणि कर्मचाºयांच्या मानधन देयकाचा अध्यादेश निघाला नव्हता. यामुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019