केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST2020-10-14T05:00:00+5:302020-10-14T05:00:20+5:30

प्रा. सुभाष वाठोरे असे या प्राध्यापकाचे नाव असून ते ठाणे येथे ज्ञानसाधना महाविद्यालयात २५ वर्षांपासून प्राध्यापकाची नोकरी करीत आहे. ब्राम्हणगाव येथे त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. नोकरीमुळे इच्छा असूनही ते शेतीकडे वळू शकले नव्हते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे त्यांना गावाकडे परत यावे लागले. या सुटीच्या कालावधीत त्यांनी शेतीवर लक्ष केंद्रीत करून हळदीचे पीक घेतले. सध्याही आॅनलाईन अध्यापनाच्या कामामुळे त्यांना शेतीवरही लक्ष देता येणे शक्य होत आहे.

It is done by doing, it should be done first | केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे

केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे

ठळक मुद्देप्राध्यापकाने चार एकरात फुलविले हळदीचे पीक : लॉकडाऊन काळात गावी परतले, संधीचे केले सोने

 अविनाश खंदारे
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : लॉकडाऊनमध्ये अनेक शहरी कर्मचाऱ्यांना मूळ खेड्यात परतावे लागले. मात्र याच सक्तीच्या सुटीचा उपयोग करीत एका प्राध्यापकाने चार एकरात हळदीचे पिक फुलवून संधीचे सोने केले.
प्रा. सुभाष वाठोरे असे या प्राध्यापकाचे नाव असून ते ठाणे येथे ज्ञानसाधना महाविद्यालयात २५ वर्षांपासून प्राध्यापकाची नोकरी करीत आहे. ब्राम्हणगाव येथे त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. नोकरीमुळे इच्छा असूनही ते शेतीकडे वळू शकले नव्हते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे त्यांना गावाकडे परत यावे लागले. या सुटीच्या कालावधीत त्यांनी शेतीवर लक्ष केंद्रीत करून हळदीचे पीक घेतले. सध्याही आॅनलाईन अध्यापनाच्या कामामुळे त्यांना शेतीवरही लक्ष देता येणे शक्य होत आहे. आज त्यांच्या हळद पिकाला शंभर दिवस पूर्ण झाले आहे. हे पीक साडेपाच ते सहा फूट उंचीचे बहरले असून येणाऱ्या जाणाऱ्यांना आकर्षित करीत आहे. काढणीला येण्यासाठी १४० दिवस असा मोठा कालावधी शिल्लक राहिलेला असताना त्यांचे पीक आजच सुदृढ अवस्थेत वाढले आहे. त्यामुळे प्राध्यापकाच्या कास्तकारीचे कौतुक होत आहे. चार महिन्यात शेतीशी समरस होऊन प्रा. वाठोरे यांनी आपले पीक तळहातावरील फोडाप्रमाणे जपले.
यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी येथे मेहनती शेतकºयांची कमतरता नाही, असे मत प्रा. सुभाष वाठोरे यांनी व्यक्त केले.

Web Title: It is done by doing, it should be done first