शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

चुरमुरा खदानीतील अवैध उत्खननाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:33 IST

गिट्टी खदानीसाठी महसूल विभागाने दिलेल्या तालुक्यातील चुरमुरा येथील ई-वर्ग जमिनीसोबतच वन विभागाच्या जमिनीवर अवैध उत्खनन करण्याचा प्रकार उघडकीस आला असून.....

ठळक मुद्देवनविभागाचे पथक : महसूलची ई-वर्ग सोडून वनजमिनीवर उत्खनन

ऑनलाईन लोकमतउमरखेड : गिट्टी खदानीसाठी महसूल विभागाने दिलेल्या तालुक्यातील चुरमुरा येथील ई-वर्ग जमिनीसोबतच वन विभागाच्या जमिनीवर अवैध उत्खनन करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाची वन विभागाने दखल घेतली असून यवतमाळच्या विभागीय वन अधिकाऱ्यांनी गुरुवारी या खदानीची पाहणी करून चौकशी केली. विशेष म्हणजे या अवैध उत्खनन प्रकरणी यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते.उमरखेड तहसील कार्यालयाने काही वर्षापूर्वी चुरमुरा येथे गिट्टी खदानीसाठी ई-वर्ग जमीन लिज तत्वावर दिली होती. मात्र या व्यतिरिक्त वन विभागाची जमीन बळकावून संबंधित खदान मालकाने तेथे उत्खनन केले होते. शासनाचे कोट्यवधी रुपयांचे गौण खनिज वापरण्यात आले.याबाबत योग्य कारवाई करण्यासाठी राजेश खंदारे व राजेश मुडे यांनी यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत चौकशीचे आश्वासन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने वन विभागाकडून चौकशी समिती नेमण्यात आली. विभागीय वन अधिकारी (दक्षता)चे पी.बी. राठोड यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी चुरमुरा येथे आले. महसूल व वन विभागाच्या सिमेची चाचपणी केली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडून उत्खनन झालेल्या जागेचे मूल्यांकन प्राप्त होताच नुकसानीची रक्कम संबंधितांकडून वसूल करू असे चौकशी अधिकाºयांनी सांगितले. आता या प्रकरणी किती दंड होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.