शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

आझाद मैदानातील वसुलीत अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

आझाद मैदानातील दुकानांच्या महसूल वसुलीत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी अनिरूध्द बक्षी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समिती नेमली.

ठळक मुद्देमहिला तलाठी वादात : चौघांची चौकशी समिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहराची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आझाद मैदानातील दुकानांच्या महसूल वसुलीत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी अनिरूध्द बक्षी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समिती नेमली.आझाद मैदानात अनेक हातगाड्या व दुकाने थाटली जातात. त्यापोटी नियमानुसार शासनाकडे चालानमार्फत रक्कम भरावी लागते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दुकानांकडून परस्परच मासिक वसुली केली गेली, त्याच्या रितसर पावत्याही दिल्या गेल्या नाही. उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयातील महिला तलाठ्याच्या या गैरप्रकाराची महसूल खात्यात चर्चा होऊ लागली. दरम्यान, या अनुषंगाने उपविभागीय महसूल अधिकारी बक्षी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली. हा गंभीर प्रकार निदर्शनास येताच बक्षी यांनी नायब तहसीलदार एकनाथ बिजवे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमली. या समितीमध्ये नंदकिशोर शिरभाते, महेंद्र कठणकर व अमोल बोंद्रे यांचा समावेश आहे. या समितीने ८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान येथे जाऊन इन कॅमेरा बयाणे नोंदविली. तेव्हा आकाश नामक युवक २२ दुकानांकडून दरमहा ५०० रुपयेप्रमाणे, एक काका आठ दुकानांकडून दरमहा हजार रुपये तर काही दुकानांकडून वसीम नामक युवक वसुली करीत असल्याचे मात्र त्याच्या पावत्या दिल्या जात नसल्याचे पुढे आले. चौकशीच्या भीतीने काहींनी आपली दुकानेच बंद केली आहेत. या प्रकरणाचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे. आझाद मैदानातील ही वसुली सप्टेंबर २०१८ पासून महसूल विभागाने आपल्या ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. तत्कालिन महसूल अधिकाºयाच्या आशीर्वादाने ही परस्पर वसुली सुरू होती, असे सांगितले जाते.आझाद मैदानात नियमित दुकानांची संख्या कमी दिसत असली तरी वर्षेभर मीनाबाजार, क्राफ्ट मेला, स्वेटर विक्रेते यांची दुकाने लागतात. त्यांच्याकडून होणारी वसुली वेगळीच असते. त्यामुळे अपहाराची रक्कम नेमकी किती लाख असावी, याचा अंदाज महसूल यंत्रणेतून लावला जातो आहे.विद्यमान एसडीओंच्या सतर्कतेने हा घोटाळा पुढे आला, एवढे निश्चित ! यापूर्वी मात्र या घोटाळ्याला प्रशासनातून अभयच दिले गेल्याचे बोलले जाते.तक्रारदारांना आता जादा रक्कम परताव्याचे आमिषया चौकशीची कुणकुण लागताच त्या महिलेने सारवासारव सुरू केली आहे. दुकानदारांना त्यांच्याकडून वसूल केलेल्या रकमेपेक्षा आणखी पाच-दहा हजार रुपये जास्त देण्याची तयारी दर्शविली आहे. केवळ त्यांनी लेखी अथवा आपल्याविरोधात बयाण देऊ नये, दिले असेल तर ते परत घ्यावे, अशी अट ठेवण्यात आली.

टॅग्स :Socialसामाजिक