शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या वेतनासाठी ‘सीएमपी’ प्रणाली राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा बुधवारी सभापती श्रीधर मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षकांच्या वेतन विलंबासोबतच गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह येत असलेल्या शिक्षकांचा मुद्दाही सभेत चर्चिला गेला. शिक्षक कोरोना काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांसह सर्वच कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे यांनी लावून धरली.

ठळक मुद्देशिक्षण समिती सभेत सदस्य आक्रमक : बीडीएस प्रणालीबाबत रोष, कोविड सेंटरसाठी आग्रह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदशिक्षकांचे वेतन ऐन कोरोना काळात विलंबाने होत आहे. त्यामुळे वेतन अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा तातडीने अवलंब करावा, अशी आग्रही भूमिका शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी मांडली. त्यावर सभापतींनी येत्या चार दिवसात याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासनही दिले. जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा बुधवारी सभापती श्रीधर मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षकांच्या वेतन विलंबासोबतच गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह येत असलेल्या शिक्षकांचा मुद्दाही सभेत चर्चिला गेला. शिक्षक कोरोना काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांसह सर्वच कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे यांनी लावून धरली. या मागणीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिले असून त्यावर लवकरच निर्णय होइल, असे सभापतींनी स्पष्ट केले. जालना, हिंगोली अशा ठिकाणी सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांचे पगार वेळेत होत आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत मात्र शासनाचे अनुदान आल्यावरही वेतनाला विलंब का होतो, असा सवाल काठोळे यांनी उपस्थित केला. बीडीएस प्रणाली बंद केल्याने जीपीएफ मिळण्यात अडचणी आल्या, मेडिकल बिल मिळणे कठीण झाले, गेल्या तीन महिन्यांपासून पगारही झाले नाही, याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. तसेच चटोपाध्यायचे १७४ प्रस्ताव येत्या चार दिवसात सादर होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर, प्रीतीताई काकडे, निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे, डाॅ. सतपाल सोवळे, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

रिक्त पदे भरा, बदल्या करा शिक्षण विभागातील रिक्तपदांचा मुद्दा यावेळी डाॅ. सतपाल सोवळे यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात १२८२ एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्यात १९० मुख्याध्यापक, तर ४३४ विषय शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा पदोन्नतीने भरणे शक्य आहे. रिक्त पदांचा अनुशेष कमी करण्यासाठी तत्काळ पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी सोवळे यांनी लावून धरली. बदल्या रद्द करण्याबाबत अद्याप शासनाचा कुठलाही आदेश नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अवघड क्षेत्राची यादी जाहीर करणे, सेवाज्येष्ठता यादी पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक