शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी ठरविले तर कुटुंबाची स्थिती बदलेल

By admin | Updated: March 9, 2017 00:19 IST

परिस्थिती बदलवायची असेल, तर अखंड परिश्रम घ्यावे लागतील. त्याकरिता महिलांनी पुढाकार घेतल्यास कुटुंबाची स्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही,

सचिंद्र प्रताप सिंह : महिला मेळावा, महिला आर्थिक विकास महामंडळाचा पुढाकार यवतमाळ : परिस्थिती बदलवायची असेल, तर अखंड परिश्रम घ्यावे लागतील. त्याकरिता महिलांनी पुढाकार घेतल्यास कुटुंबाची स्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. येथील कोल्हे सभागृहात महिला मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. महिला आर्थिक विकास महामंडळ व समन्वयीत कृषी विकास प्रकल्पातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला होते. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत देशपांडे, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, ऋषीकेश घ्यार, सविता देशमुख, राम साहू, शैलेंद्र जिद्देवार, शेख रसूल, राहू वसाके, सुमित गोल्हर यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांनी गृह उद्योगासोबत विविध क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. कठोर परिश्रमाने प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. दीपक सिंगला यांनी आपले कुटुंब सक्षम करण्यासाठी प्रत्येक महिलांनी हातभार लावण्याची गरज असल्याचे सांगितले. मेळाव्यात यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. पशु सखी, इंटरनेट साथी, कायदा साथी, गाव विकास समिती, सीएमआरसी उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. तुरडाळ प्रकल्पाकरिता मारेगाव आणि नेर सीएमआरसीला धनादेश देण्यात आला. संचालन सुनंदा मानकर, आभार समिर देशमुख यांनी मानले. (शहर वार्ताहर)