शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

हैद्राबादकडे जाणारे सागवान ट्रक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:27 IST

परवानगीपेक्षा जादा सागवान हैद्राबादकडे जात असल्याच्या संशयावरून रविवारी जोडमोहा येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी दोन ट्रक ताब्यात घेतले.

ठळक मुद्देतस्करीचा संशय : वनविभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परवानगीपेक्षा जादा सागवान हैद्राबादकडे जात असल्याच्या संशयावरून रविवारी जोडमोहा येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी दोन ट्रक ताब्यात घेतले. त्यातील सागवानाची मोजणी केली जात आहे.कळंब तालुक्यातील पार्डी नकटी येथील काही शेतकºयांच्या शेतातील सागवान झाडे किनवट येथील कंत्राटदाराने खरेदी केले. त्यासाठी त्याने परवाना काढला. मात्र वाहतूक परवाना आणि प्रत्यक्षातील ट्रकमध्ये असलेल्या सागवानात मोठी तफावत असल्याची माहिती वनाधिकाºयांना मिळाली. त्यावरून रविवारी सकाळी जोडमोहा येथील वनकर्मचाºयांनी दोन ट्रक (क्र.एम.एच.२६-एच.७०४२ आणि एम.एच.२६-एच.५५९७) ताब्यात घेतले. या दोन्ही ट्रकमध्ये वाहतूक परवान्यावर नोंद असलेलेच सागवान आहे की त्यापेक्षा जादा सागवान आहे. याची खातरजमा केली जात आहे.सध्या सागवान तस्करीला उधाण आले आहे. या ट्रकमधून सागवानाची तस्करी केली जात होती का, हे आता मोजमाप केल्यानंतरच उघडकीस येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन वानखडे यांनी सांगितले. वाहतूक परवान्यापेक्षा जादा सागवान आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.