शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कापसाला एकरी २० हजार रुपये मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

मागील पाच वर्षात भाजपच्या सरकारने, शेतकरी विरोधी धोरणे राबवून, शेतकऱ्यांची धुळधान केलेली आहे. परिणामी महाराष्ट्रात कधी नव्हे ते या पाच वर्षाच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अदानी, अंबानी सारख्या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठीच शेतकऱ्यांना उध्दवस्त करून शेती मालाचे भाव षडयंत्र करून पाडले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन, शासनाला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परतीच्या पावसाने व अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. हाती आलेले सोयाबीनचे पीक पावसाने जमिनीवरच सडून त्याला कोंब आलेले आहे. कापसाचीही बोंडे सडल्याने कापुसही हातचा गेला आहे पण; सत्ताधारी भाजप नेते सत्ता संपादनाच्या मस्तीत गुंग झालेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आंदोलन करुन शासनाचा निषेध नोंदविला तसेच अतिपावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादकाला एकरी २० हजार रुपयाची तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.मागील पाच वर्षात भाजपच्या सरकारने, शेतकरी विरोधी धोरणे राबवून, शेतकऱ्यांची धुळधान केलेली आहे. परिणामी महाराष्ट्रात कधी नव्हे ते या पाच वर्षाच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अदानी, अंबानी सारख्या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठीच शेतकऱ्यांना उध्दवस्त करून शेती मालाचे भाव षडयंत्र करून पाडले. कांदा भाववाढीचे निमित्त करून, पाकिस्तानचा कांदा आयात केला. कापसाची आयात करून, हमी भावापेक्षाही कापसाचे भाव कमी आणले, तर सोयाबीन भावाची वाताहत केली. आज शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनिय आहे. कर्जमाफीच्या नावाखाली नुसते गाजर दाखविले. केवळ अंबानीच्या विमा कंपण्याच्या तिजोऱ्या भरण्यासाठीच शेतीचा पिक विमा जबरीने लादला. सरकारने व जिल्ह्यामधील शासकीय यंत्रणांनी आता तरी जागे होवून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी व त्यांना भरपाई मिळण्यासाठी तत्काळ शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत. जिल्हाधिकारी यांनी तत्काळ शासकीय यंत्रनाला आदेश देवून, त्यावर कारवाई करावी, कृषि विभागाने तातडीने पुढाकार घेवून, शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्यासाठी तत्काळ कागदपत्रांची पुर्तता करून घ्यावी तसेच कापसाला हमी भाव कमी असल्याने शासनाने प्रति क्विंटल २ हजार ५०० रुपये बोनस जाहीर करावे व सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. जर मागण्या पुर्ण झाल्या नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचाही इशारा दिला.निवासी जिल्हाधिकारी सुनिल कोरडे यांना निवेदन देतांना प्रदेश सचिव प्रा.दिवाकर गमे, जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, माजी आमदार राजु तिमांडे, लक्ष्मीनारायण सोनवणे, संजय काकडे, जि.प.सदस्य धनराज तेलंग, मदन मोहता, अनंता झाडे, गोपाल मरस्कोल्हे, प्रदिप डगवार, संजय तपासे, विशाल हजारे, निळकंठ पिसे, दिनक अंबुलकर, निळकंठ राऊत, अ‍ॅड. महेंद्र धोटे, केशव तितरे, विरेंद्र नागतोडे, भारत चौधरी, श्याम जगताप, कवडुजी बुरंगे, जयंत भालेराव, मधुकर टोनपे, अंबादास वानखेडे, तुळशीराम राऊत, सुनिल भोगे, विनायक बोंडे, सरोज किटे, विणा दाते, सिधु साबळे, विनोद पांडे, प्रविण निंबाळकर, सुधीर मुंजेवार, मधुकर कामडी, शामसुंदर देशमुख, मिलिंद हिवलेकर, प्रा.खलील खतीब, विकास खोडके, बाबाराव झलके, रोहीणी पाटील, किरण कडू, रेखा खेळकर, पंकज घोडमारे, सुरेश सातोकर, वासुदेव ढुमणे, संदीप राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे व महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस