शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मध्यरात्री अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST

रविवारी सकाळी शहरात मुख्याधिकारी धीरज गोहाड, तर ग्रामीणमध्ये तहसीलदार सुभाष जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. त्यांनी नुकसानीच्या सर्व्हेचे आदेश दिले. दुपारपर्यंत प्राथमिक अहवाल देण्यात आला. संपूर्ण सर्व्हेनंतर नुकसानीची आकडेवारी स्पष्ट होणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह तुफान बरसला.

ठळक मुद्देदारव्हात ११० मिमी बरसला : आठ हजार हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान, घरांचीही हानी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने  १०५ गावांना जबर तडाखा बसला. सात हजार ७१५ हेक्टरवरील पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. २७७ घरांची पडझड झाली. दुकानात पाणी शिरले, रस्ते, पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला.रविवारी सकाळी शहरात मुख्याधिकारी धीरज गोहाड, तर ग्रामीणमध्ये तहसीलदार सुभाष जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. त्यांनी नुकसानीच्या सर्व्हेचे आदेश दिले. दुपारपर्यंत प्राथमिक अहवाल देण्यात आला. संपूर्ण सर्व्हेनंतर नुकसानीची आकडेवारी स्पष्ट होणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह तुफान बरसला. केवळ दोनच तासात ११० मि.मी. पाऊस पडल्याने शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांसह ग्रामीण भागातील शेती, घरांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात काही गावात ढगफुटीसारखा पाऊस पडला. नदी, नाल्याकाठच्या गावात पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पिके वाहून गेली. जमीन खरडून गेली. दारव्हा, लाडखेड, महागाव, बोरी, लोही, चिखली, मांगकिन्ही या ७ मंडळातील १०५ गावांत मोठे नुकसान झाले. दारव्हा-यवतमाळ राज्य मार्गावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रात्रीपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

बसस्थानक परिसराला नदीचे स्वरूप- दारव्हा शहरातील लेंडी नाल्याचे पाणी आजुबाजूच्या परिसरात शिरल्याने यवतमाळ, आर्णी हे प्रमुख मार्ग, तसेच गोळीबार चौक, बसस्थानक चौकात कंबरभर पाणी साचले होते. या भागाला नदी, नाल्याचे स्वरूप आले होते. दुकाने अर्ध्याअधिक प्रमाणात पाण्याखाली गेली. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. नातूवाडी, अंबिकानगरसह विविध परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. नाल्याचे खोलीकरण, बांधकामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे व्यावसायिक, नागरिकांमध्ये नाराजी आहे.

  विडूळ परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान

- विडूळ : उमरखेड तालुक्यातील धानोरा (साचदेव) परिसरात शनिवारी तब्बल दीड तास पाऊस कोसळला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. धानोरा (सा) गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच सोयाबीनची दुबार, तिबार  पेरणी केली होती. पावसामुळे पेरलेले सोयाबीन शेतातून अक्षरशः वाहून गेले. अनेकांची जमीन खरडून गेली. नाल्या काठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावातही पूर सदृश्य स्थिती निर्माण होऊन अनेक घरात पाणी शिरले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गावात साधी विचारपूस करण्यासाठी तलाठी येऊन गेले. मात्र, ते कोणालाही दिसले नाही. तलाठ्याबाबत गावात नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसामुळे धानोरासह ब्राह्मणगाव, चालगणी, विडूळ, वांगी शिवारातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करून त्वरित अहवाल सादर करण्यास संबंधित तलाठ्यास कळविल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Rainपाऊस