जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:01:02+5:30

जिल्ह्यात १५ जूनला पाऊस बरसला. त्यानंतर बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. मात्र उन्हाचा पारा अधिक असल्याने ही धडपड व्यर्थ जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. अनेकांना पाण्याची व्यवस्था असतानाही ओलित करता आले नाही. यामुळे पीक शेवटच्या घटका मोजत होते.

Heavy rains in the district, relief to crops | जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पिकांना दिलासा

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पिकांना दिलासा

Next
ठळक मुद्देराळेगावात दुकानात शिरले पाणी : यवतमाळ, कळंब, दारव्हा तालुक्यात धुव्वाधार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तब्बल १८ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेवटच्या घटका मोजणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले. तर पेरणी बाद झालेल्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करण्यासाठी या पावसाची मोठी मदत होणार आहे. राळेगाव तालुक्यात अतिपाऊस झाल्याने दुकानांमध्ये पाणी शिरले.
जिल्ह्यात १५ जूनला पाऊस बरसला. त्यानंतर बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. मात्र उन्हाचा पारा अधिक असल्याने ही धडपड व्यर्थ जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. अनेकांना पाण्याची व्यवस्था असतानाही ओलित करता आले नाही. यामुळे पीक शेवटच्या घटका मोजत होते. शुक्रवारी बहुतांश भागात पाऊस बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. उणे पावसाने शेतकऱ्यांची चांगली गोची झाली आहे. शुक्रवारी बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी उत्पन्न प्रभावित होण्याचाही धोका वर्तविला जात आहे.
गुरूवारी रात्री राळेगावात अर्ध्या तासात ६३ मिमी पावसाची नोंद झाली.
हा पाऊस जोरदार होता. त्रिमूर्ती कॉम्पलेक्सच्या दुकानात हे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे ५० लाखांचे नुकसान झाले. राळेगावात जोरदार पाऊस बरसल्याने कृषीसेवा केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्याच्या दुकानांना याचा फटका बसला. कळंबच्या थाळेगाव पुनर्वसन येथे अनेक घरात पाणी घुसले. कामठवाडा येथे पूल वाहून गेला.

मासिक सरासरीच्या केवळ २३ टक्के पाऊस
जिल्ह्यात सरासरी १० मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये यवतमाळ १.९ मिमी, बाभूळगाव १५.७ मिमी, कळंब ३७.४, दारव्हा ५.३, दिग्रस ९.२, आर्णी १०.२, नेर ०.६, पुसद १०.६, उमरखेड १, महागाव १४, वणी २३, मारेगाव ३, झरी २, केळापूर ४, घाटंजी ५ आणि राळेगाव १६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या केवळ २३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद पिकांसाठी चिंताजनक आहे.

Web Title: Heavy rains in the district, relief to crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस