शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

वादळी पावसाने बुधवारपासून तालुक्यात हजेरी लावली. बुधवारी तालुक्यात सरासरी ५७ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात ९१.५० मिमी पाऊस कोसळला. पेरणी योग्य मृगधारा बरसल्याने शेती मशागतीला वेग आला आहे. बळीराजा पेरणीच्या तयारीत व्यस्त झाला आहे. ४ जूनला ३४.५० मिमी पाऊस झाल्यानंतर एकदम पावसाने बुधवारी दुपारीच हजेरी लावली.

ठळक मुद्देफुलवाडीत टीनपत्रे उडाली : आत्तापर्यंत ९७ मिमी पाऊस, बळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. वादळी पावसामुळे फुलवाडी परिसरात अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली. मात्र या पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीच्या तयारीत व्यस्त आहे.वादळी पावसाने बुधवारपासून तालुक्यात हजेरी लावली. बुधवारी तालुक्यात सरासरी ५७ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात ९१.५० मिमी पाऊस कोसळला. पेरणी योग्य मृगधारा बरसल्याने शेती मशागतीला वेग आला आहे. बळीराजा पेरणीच्या तयारीत व्यस्त झाला आहे. ४ जूनला ३४.५० मिमी पाऊस झाल्यानंतर एकदम पावसाने बुधवारी दुपारीच हजेरी लावली. विजांचा कडकडाट झाला. तब्बल अर्धातास पाऊस कोसळला. वादळामुळे फुलवाडी परिसरातील काही घरांवरील टीनपत्रे उडाली. त्यामुळे घरात ठेवलेला शेतमाल, बियाणे, खते ओले झाले. राजेंद्र चव्हाण यांनी पंचनामा करून मदत करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे.शेंबाळपिंपरी महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या फुलवाडी, देवठाणा, जवळी, सांडवा, मांडवा आदी परिसरातील काही घरांवरील टीनपत्रे बुधवारच्या वादळाने उडाली. बुधवारी वरुड मंडळात ३० मिमी, ब्राम्हणगाव सात मिमी, खंडाळा ४४ मिमी, शेंबाळपिंपरी २७ मिमी, जांबबाजार ३७ मिमी, गौळ (खुर्द) ३० मिमी तर बेलोरा (बु) १२ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे फुलवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे बियाणे व खत भिजल्याचे शेतकरी इशांत चव्हाण यांनी सांगितले.पेरणी योग्य पावसाने मिळाला दिलासाआतापर्यंत तालुक्यात ९१.५० मिमी पाऊस बरसला. कृषी विभागाने १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केले होते. आता पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामी लागले आहे. बळीराजा समाधानी असल्याचे पिंपळखुटा येथील शेतकरी रणवीर टाले यांनी सांगितले. दरम्यान बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकºयांच्या घरांचे अथवा शेतमालाचे नुकसान झाले. त्याचा पंचनामा करण्याचे आदेश सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांना दिल्याचे तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस