सरकारने टाळली पेन्शन, मित्रांनी कमी केले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:13+5:30

एप्रिल महिन्यात यवतमाळ येथील सचिन ढोले व अमरावती येथील अनिल आढे या दोन आरोग्यसेवकांचा मृत्यू झाला. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अखेर ‘महाराष्ट्र आरोग्यसेवक’ या व्हॉट्सअप ग्रूपवर त्यांच्या परिवाराला मदत करण्याबाबत चर्चा झाली.

Government avoids pension, friends reduce tension | सरकारने टाळली पेन्शन, मित्रांनी कमी केले टेन्शन

सरकारने टाळली पेन्शन, मित्रांनी कमी केले टेन्शन

Next
ठळक मुद्देआरोग्यसेवकांची माणुसकी : मृत सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी उभारला निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आरोग्यसेवक म्हणून रुग्णांसाठी झटणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यावर सरकारी पातळीवरून त्यांच्या निराधार कुटुंबाला कोणतीही मदत मिळू शकली नाही. पेन्शनचा लाभ सरकारने टाळला. अखेर इतर आरोग्यसेवक मित्रांनीच एकत्र येऊन या दोन्ही कुटुंबीयांना मदतनिधी गोळा करून आधार दिला.
एप्रिल महिन्यात यवतमाळ येथील सचिन ढोले व अमरावती येथील अनिल आढे या दोन आरोग्यसेवकांचा मृत्यू झाला. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अखेर ‘महाराष्ट्र आरोग्यसेवक’ या व्हॉट्सअप ग्रूपवर त्यांच्या परिवाराला मदत करण्याबाबत चर्चा झाली. संजय सोनार कळवाडीकर, उमेश दिघाडे, प्रवीण चापके, नागनाथ दमकोंडवार, रुपेश वासनकर व इतर आरोग्यसेवकांनी चर्चा करून स्वच्छेने मदतनिधी जमा करण्यास सुरुवात केली. ७२ हजार २११ रुपयांचा मदतनिधी जमा झाला. त्याची समान विभागणी करून मृत आरोग्यसेकांच्या घरी जाऊन मदत देण्यात आली. हा मदतनिधी कायमस्वरुपी पुरणारा नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी, असे मत जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विभागीय अध्यक्ष मिलिंद सोळंके यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र दाभाडकर, शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीचे अमरावती विभागीय अध्यक्ष तथा राज्य समन्वयक मिलिंद सोळंके, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा जुनी पेन्शन हक्क संघटनचे विश्वस्त नदीम पटेल, प्रवीण चापके, मनोज सरदार, मिलिंद पिंपळशेंडे, नीलेश सोनोने आदी उपस्थित होते.

Web Title: Government avoids pension, friends reduce tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.