शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना दमदाटी

By admin | Updated: January 13, 2016 03:04 IST

तालुक्यातील हटवांजरी येथे नियोजित लघु सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना नोटीस देऊन दमदाटी करण्यात येत आहे.

वाटाघाटींची मागणी : हटवांजरी येथील लघु सिंचन प्रकल्पमारेगाव : तालुक्यातील हटवांजरी येथे नियोजित लघु सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना नोटीस देऊन दमदाटी करण्यात येत आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांसोबत सामोपचाराने चर्चा, वाटाघाटी करून त्यांच्या जमिनी अधिग्रहित कराव्या, अशी मागणी होत आहे.विदर्भ पाटबंधारे विभागाअंतर्गत हटवांजरी येथे २७८ हेक्टर सिंचन अपेक्षित असणाऱ्या लघु सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी परिसरातील ४५ शेतकऱ्यांची ६७ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी ‘दलालां’च्या माध्यमातून काही शेतकऱ्यांच्या जमिनी विक्री करून अधिग्रहित केल्या आहे. तथापि अद्याप ११ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या नाहीत.सन २००७ मध्ये जमिनी अधिग्रहणाची नोटीस मिळताच तेथील नीळकंठ महादेव कालेलकर नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, हे विशेष. त्यांच्या आत्महत्येमुळे जमीन अधिग्रहणाचे काम थंडावले होते. आता तब्बल आठ वर्षानंतर पुनश्च शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुणावरही आत्महत्येची वेळ येऊ नये, म्हणून संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी, शेतकऱ्यांना नोटीस बजावून, धाकदपट करण्यापेक्षा उर्वरित ११ शेतकऱ्यांसोबत समोपचाराने वाटाघाटी कराव्या, शेतकऱ्यांना सध्याच्या बाजारभावापेक्षा चौपट दराने मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)