शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:55+5:30

सध्या तालुक्यात तूर काढणीला वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सवंगणीनंतर तूर काढणी सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून येथील बाजार समितीत तुरीची आवक प्रचंड वाढली आहे. दररोज बैलबंडीसह वाहनांमध्ये तूर आणली जात आहे. यवतमाळनंतर येथील बाजार समिती सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. मात्र शेतकऱ्यांना येथे शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असूनही रस्त्यावर शेतमाल ठेवण्याची वेळ आली आहे.

Farmers' commodities on the open | शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर

शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देपुसद बाजार समिती : व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये, कास्तकार मोजणीच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून तुरीची आवक वाढली आहे. मात्र शेतकºयांना तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्यांचा शेतमाल उघड्यावर आहे. त्याचवेळी व्यापाºयांचा शेतमाल मात्र बाजार समितीच्या शेडमध्ये असल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या तालुक्यात तूर काढणीला वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सवंगणीनंतर तूर काढणी सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून येथील बाजार समितीत तुरीची आवक प्रचंड वाढली आहे. दररोज बैलबंडीसह वाहनांमध्ये तूर आणली जात आहे. यवतमाळनंतर येथील बाजार समिती सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. मात्र शेतकऱ्यांना येथे शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असूनही रस्त्यावर शेतमाल ठेवण्याची वेळ आली आहे. बाजार समितीच्या व्यापारीधार्जीन्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
यंदा तुरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाले आहे. दररोज एक हजार ते दीड हजार पोते विक्रीस येत आहे. मात्र शेडमध्ये व्यापाºयांची तूर असल्याने शेतकऱ्यांना आपली पोते रस्त्यावरच ठेवावी लागत आहे. शेतमालाच्या राखणीसाठी त्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. बाजार समितीच्या नियमानुसार सात दिवसांच्या आत या शेडमधील शेतमाल उचलणे बंधनकरक आहे. मात्र व्यापाऱ्यांना झुकते माप देत बाजार समिती त्यांच्या शेतमालाची उचल करीत नाही.
बाजार समितीचे संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने व्यापारी निर्धास्त आहे. शेतकºयांना मात्र आपला शेतमाल उन्हातान्हात रस्त्यावर ठेवून त्याची राखण करावी लागत आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बाजार समितीत अनेक दिवस मुक्काम करावा लागत असल्यानेही शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे.

व्यापाऱ्यांना नोटीस देऊन चार ते पाच दिवसात शेड रिकामे करण्यास सांगितले जाईल. तुरीची आवक वाढल्याने हा प्रसंग उद्भवला आहे.
- कौसरभाई
सभापती, बाजार समिती, पुसद

Web Title: Farmers' commodities on the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.