शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
3
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
4
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
5
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
6
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
7
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
8
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
9
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
10
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
11
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
12
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
13
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
14
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
15
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
16
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
17
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
18
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
19
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
20
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमी मताधिक्याने विजयाचे दावे फोल

By admin | Updated: January 28, 2016 02:34 IST

यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक कधी नव्हे ऐवढी चुरशीची झाली.


यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक कधी नव्हे ऐवढी चुरशीची झाली. थेट लढत असलेल्या सहकार आणि महासमन्वय पॅनलने केलेले मताधिक्याने विजयाचे दावे फोल ठरले आहे. दोन्ही पॅनलने ५०० ते १००० मताधिक्याने विजयाचा दावा केला होता. एकही विजयी उमेदवार तीन हजार ५०० मतापर्यंत पोहोचला नाही. सर्वाधिक ३ हजार ४६७ मते सहकार पॅनलचे प्रमुख राजूदास जाधव यांनी घेतली. याच पॅनलचे मारोती आत्राम हे केवळ २८ मतांनी विजयी झाले.
७ हजार ७०० मतदार असलेल्या या संस्थेत किमान ५०० पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयाची अपेक्षा केली जात होती. परंतु कुणीही ३०० पेक्षा अधिक मताधिक्य घेतले नाही. या निवडणुकीत दोन्ही पॅनलचे ३४ आणि इतर नऊ असे ४३ उमेदवार रिंगणात होते. महिला राखीव गटातून दोन्ही पॅनलला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला.
सहकार पॅनलच्या नंदा नागनाथ चाटे या ३ हजार ३२७ मते घेऊन तर महासमन्वय पॅनलच्या सुचिता शांताराम बोंद्रे ३ हजार ३२५ मते घेऊन विजयी झाल्या. याच मतदारसंघातील सहकार पॅनलच्या सुनंदा आनंदराव वडपल्लीवार ३०८४ तर महासमन्वयच्या मानंदा गणपतराव राठोड यांनी ३२१३ मते घेतली. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून महासमान्वय पॅनलचे मधुकर दिगांबर काठोडे यांनी ३५२६ मते घेत विजय नोंदविला. समन्वय पॅनलचे भानुदास राऊत यांनी ३३१३ मते घेतली.
सर्वात अटीतटीची लढत अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघात झाली. सहकार पॅनलचे मारोती आत्राम ३३१८ मते घेत विजयी झाले, त्यांनी महासमन्वय पॅनलचे राजू सूर्यवंशी ३२९० यांचा केवळ २८ मतांनी पराभव केला.
विजाभज/विमाप्र मतदारसंघातून सहकार पॅनलचे नंदेशकुमार चव्हाण यांनी ३ हजार ५६१ मते घेत विजय मिळविला. महासमन्वय पॅनलचे साहेबराव पवार यांना ३३३८ मते मिळाली. २२३ मतांनी चव्हाण यांचा विजय झाला.
सर्वसाधारण मतदारसंघातील विजयी उमेदवारांनी घेतलेली मते असे आहेत. सहकार पॅनलचे राजूदास जाधव (३४६७), चित्तरंजन कडू (३३३५), राजेंद्र पिंपळशेंडे (३३१५), डॉ. दिलीप चौधरी (३३०९), प्रवीण राणे (३२७४), दीपक दोडके (३२७१), गौतम कांबळे (३२५९), एकनाथ गाडगे (३२५४), अनिल जयसिंगपुरे (३२४७), शेख लुकमान शेख रहेमान (३२२३), महासमन्वय पॅनलचे संजय गावंडे (३२६२), मुकेश भोयर (३२४१) विजयी झाले.
सकाळी १० वाजता येथी मतमोजणीला सुरूवात झाली. सायंकाळी ४ वाजता निकालाचे चित्र स्पष्ट झाले.
मात्र काही जागांवर फेरमतमोजणी मागण्यात आल्याने रात्री ११ वाजता उमेदवारांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)