पावसाचे महिने संपले तरी जिल्ह्यात निम्माच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:23+5:30

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. काही मोजके प्रकल्प याला अपवाद आहे. यामुळे ओलितावर मर्यादा येणार आहे. पूस, बेंबळा, नवरगाव, सायखेडा, बोरगाव, निळोना आणि चापडोह प्रकल्प निर्धारित क्षमतेच्या १०० टक्के भरले. मात्र इतर १०७ प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के साठा झाला आहे.

Even after the rainy months are over, half of the district receives rain | पावसाचे महिने संपले तरी जिल्ह्यात निम्माच पाऊस

पावसाचे महिने संपले तरी जिल्ह्यात निम्माच पाऊस

Next
ठळक मुद्देकेवळ ५२ टक्के बरसला ।आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या महिन्यात रिमझीम पाऊस जिल्ह्यात बरसला. परिणामी सप्टेंबर मध्यापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाला. आता पावसाळा संपत असून येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा धोका वर्तविला जात आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. काही मोजके प्रकल्प याला अपवाद आहे. यामुळे ओलितावर मर्यादा येणार आहे. पूस, बेंबळा, नवरगाव, सायखेडा, बोरगाव, निळोना आणि चापडोह प्रकल्प निर्धारित क्षमतेच्या १०० टक्के भरले. मात्र इतर १०७ प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के साठा झाला आहे. तर दुसरीकडे सततच्या ढगाळ वातावरणाने कापूस पिकावर अळी, तुडतुडे आणि रोगांचे प्रमाण वाढले आहे. दररोज पावसाळी वातावरण कायम असले तरी जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडुंब भरण्याइतका पाऊस अद्यापही झालेला नाही. उलट सततच्या पावसाळी वातावरणामुळे शेत पिकांवर रोगराई पसरत आहे. तर रुग्णालयातही साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहे.

तालुकानिहाय पावसाचा टक्का
यवतमाळ ३९.७०
बाभूळगाव ५५.७९
कळंब ४६.९०
आर्णी ७१.९२
दारव्हा ४७.७९
दिग्रस ४८.६७
नेर ५३.२६
पुसद ६३.६८
उमरखेड ५५.३०
महागाव ५६.३८
केळापूर ४९.६८
घाटंजी ४६.१५
राळेगाव ४६.८३
वणी ६१.३०
मारेगाव ५५.७७
झरीजामणी ४८.६६
एकूण ५२.६८

Web Title: Even after the rainy months are over, half of the district receives rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.