शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत गाठण्यासाठी आठ किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST

मुसळ ग्रामपंचायत अंतर्गत निमगव्हाण हे गाव येते. वास्तविक निमगव्हाण ते मुसळ हे अंतर फारच फार दोन किलोमीटर आहे. परंतु या दोन गावांना जोडणारा रस्ता पार करताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. पांदण रस्ता आहे. संपूर्ण चिखलमय रस्त्याचा मार्ग जवळपास सहा महिनेपर्यंत बंद असतो.

ठळक मुद्देनिमगव्हाणची अशीही कहाणी : चिखल तुडवित काढावा लागतो मार्ग

निश्चल गौर ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : गावाचे ग्रामपंचायत कार्यालय फारच फार एक-दोन किलोमीटर राहील असा आपला एक अंदाज. मात्र निमगव्हाण (ता.कळंब) या गावातील लोकांना तब्बल आठ किलोमीटर प्रवास करत ग्रामपंचायतीत जावे लागते. यामध्ये व्यक्तिगत त्रास होण्यासोबतच गावाचा विकासही पार लंबा झाला आहे. पावसाळ्यात तर बेहाल असतात. याच काळात विद्यार्थी, शेतकरी आदींना विविध प्रकारचे कागदपत्र मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीचे कार्यालय गाठावे लागते.मुसळ ग्रामपंचायत अंतर्गत निमगव्हाण हे गाव येते. वास्तविक निमगव्हाण ते मुसळ हे अंतर फारच फार दोन किलोमीटर आहे. परंतु या दोन गावांना जोडणारा रस्ता पार करताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. पांदण रस्ता आहे. संपूर्ण चिखलमय रस्त्याचा मार्ग जवळपास सहा महिनेपर्यंत बंद असतो. या काळात ग्रामपंचायत कार्यालयात जायचे झाल्यास निमगव्हाण ते डोंगरखर्डा हे चार किलोमीटर आणि डोंगरखर्डा ते मुसळ हे चार किलोमीटर असे आठ किलोमीटर अंतर पार करावे लागते.निमगव्हाण गावातील स्वतंत्र ग्रामपंचायत सदस्यही नाही. कोडपाखिंडी या गावातील प्रभाग क्र.२ मधील सदस्यच या गावाचा प्रतिनिधी म्हणून काम सांभाळतात. रस्त्याच्या प्रश्नासाठी गावकरी आणि सदस्यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु लोकांचा आठ किलोमीटर होणारा प्रवास थांबविण्याची तसदी कुणी घेतली नाही. निमगव्हाणला विकासही कधी शिवला नाही. या गावात अनेक समस्या आहेत. याची जाणीव लोकप्रतिनिधींना वारंवार करून देण्यात आली. मात्र कुणीही गांभीर्य दाखविले नाही. ज्या रस्त्यावरून बैलगाडीनेही मार्ग काढता येत नाही तेथून इतर वाहने निघणार कशी हा प्रश्न आहे.मुसळ-कोडपाखिंडी-निमगव्हाण रस्त्याचा प्रस्ताव दीड वर्षांपूर्वी पाठविण्यात आला. यावर अजून तरी कुठलीही कारवाई झालेली नाही.- गीताताई पडाळकर,सरपंच, मुसळ

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतroad transportरस्ते वाहतूक