लोहारा एमआयडीसीत मेटॅडोर अपघातात चालक दबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:00:14+5:30

या अपघाताची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांना मिळाली. तातडीने शिवसैनिक संजय नेमाडे, फिरोज पठाण, छोटू उमरे, अविनाश बलकी यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. जेसीबी, क्रेन व कटरच्या मदतीने तब्बल दोन तास परिश्रम करून झाडात फसलेला मेटॅडोर बाहेर काढला. यात चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले.

The driver was crushed in a matador accident at Lohara MID | लोहारा एमआयडीसीत मेटॅडोर अपघातात चालक दबला

लोहारा एमआयडीसीत मेटॅडोर अपघातात चालक दबला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील लोहारा एमआयडीसीमध्ये चणा भरलेला मेटॅडोर झाडावर धडकला. हा अपघात रविवारी दुपारी ३.३० वाजता घडला. यात चालक केबीनमध्ये अडकला.
या अपघाताची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांना मिळाली. तातडीने शिवसैनिक संजय नेमाडे, फिरोज पठाण, छोटू उमरे, अविनाश बलकी यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. जेसीबी, क्रेन व कटरच्या मदतीने तब्बल दोन तास परिश्रम करून झाडात फसलेला मेटॅडोर बाहेर काढला. यात चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तो पिंपळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. त्याचे नाव कळू शकले नाही. वेळेत मदत मिळाल्याने या गंभीर अपघातात मेटॅडोर चालकाचे प्राण वाचले आहे.

Web Title: The driver was crushed in a matador accident at Lohara MID

टॅग्स :Accidentअपघात