शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर पालकमंत्र्यांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:14 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवासस्थान गाठले. शनिवारी दुपारनंतर येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी डॉक्टरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.

ठळक मुद्दे‘मेडिकल’ प्रशासनाविरोधात तक्रार । मंत्र्यांनी दिला सबुरीचा सल्ला, धुसफूस चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवासस्थान गाठले. शनिवारी दुपारनंतर येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी डॉक्टरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदाच ज्येष्ठ-कनिष्ठ असा वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शिस्तीच्या नावाने अनाठाई निर्णय लादले जातात, अशी तक्रार आहे. तर दुसरीकडे रुग्णसेवा व वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन जाग्यावर आणण्याकरिता कठोर निर्णय घेणे अनिवार्य असल्याचे सांगून कारवाईचे समर्थन केले जाते. दिरंगाई व चूक आढळल्यास तत्काळ चौकशी नेमणे, नोटीसा बजावणे हा प्रकार सुरू आहे. अशाही स्थितीत डॉक्टरांनी आपला संयम ठेवला. मात्र गोपनीय अहवाल पाठविताना अनेकांचे गुण अर्ध्यापेक्षा कमी करण्यात आले. ही बाब जिव्हारी लागली. सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला. पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेऊन त्यांनी आपल्यावर कसा अन्याय होतो, याचा पाढाच वाचला. आम्ही रुग्णालय सोडल्यास पर्याय नाही, असेही सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी तुम्ही संयम ठेवून काम करत राहा, अशी सूचना केली. या प्रकरणात निश्चितच तोडगा काढला जाईल, असेही सांगण्यात आले. मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस बाहेर आली. सर्वच समदुखी डॉक्टर एकत्र येऊन पालकमंत्र्यांकडे दाद मागायला गेले होते. ही बैठक अतिशय गोपनीय पद्धतीने घेण्यात आली. आता पालकमंत्री ही अडचण कशी दूर करतात, याकडे लक्ष लागले आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले ‘मेडिकल’यवतमाळचे वैद्यकीय महाविद्यालय राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. १६ तालुके व दुर्गम भाग असल्याने येथे अनेक प्रकारचे रुग्ण येतात. विशेष करून विषबाधा (विषप्राशन केलेले) झालेले सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये दाखल होतात. शेतकरी आत्महत्या असो किंवा फवारणीतून झालेली विषबाधा, दूषित पाण्यामुळे गंभीर स्वरूपाचे जडलेले पोटाचे आजार घेऊन रुग्ण येथे येतात. जनआधार मिळविण्यासाठी रुग्णसेवा हा एक मार्ग असल्याने मेडिकल कॉलेजमध्ये अनेक नेत्यांचा इंटरेस्ट वाढला आहे. डॉक्टरातील अंतर्गत धुसफूस ही या नेत्यांसाठी आयतीच संधी ठरणारा आहे. विधानसभा निवडणुकीमुळे याला आणखी रंगत येण्याची चिन्हे आहेत.