शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दारूबंदी : गांधी जयंतीचा मुहूर्त टळला

By admin | Updated: October 4, 2015 00:38 IST

यवतमाळ जिल्ह्यात पूर्णत: दारूबंदी लागू करावी या मागणीसाठी सर्वत्र आंदोलने सुरू आहेत.

ग्रामीण महिला संतप्त : आंदोलने आणखी उग्र होणार यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पूर्णत: दारूबंदी लागू करावी या मागणीसाठी सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनांची दखल घेऊन सरकार २ आॅक्टोबर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर दारूबंदीची घोषणा करेल, अशी आंदोलकांना अपेक्षा होती. त्या दृष्टीने एक्साईजकडून माहिती घेऊन सरकारस्तरावरून तयारीही सुरू होती. त्यामुळेच आंदोलकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र हा मुहूर्त टळल्याने आंदोलन करणाऱ्या ग्रामीण महिला संतप्त झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी ही बरीच जुनी मागणी आहे. चंद्रपुरात दारूबंदी झाल्याने यवतमाळातील आंदोलनाने गती घेतली. आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. सुरुवातीला या आंदोलनात केवळ ग्रामीण महिला सहभागी होत होत्या. मात्र आता त्यांना तरुणाईचीही साथ लाभली आहे. या आंदोलनांची सरकारने दखलही घेतली. आंदोलकांना चंद्रपूरची दारूबंदी घडवून आणणाऱ्या अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून न्यायाची सर्वाधिक अपेक्षा होती. दारूबंदीबाबत ते संवेदनशील आहेत. मध्यंतरी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील दारू विक्रीचा लेखाजोखा जाणून घेतला. दुकाने किती, त्यातून मिळणारा रोजगार किती, वार्षिक महसूल किती याची माहिती घेतली. जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार दारूबंदीसाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी स्वत: या गुत्त्यांवर धाडी टाकल्या. त्यामुळेच दारूबंदीसाठी गांधी जयंतीचा मुहूर्त साधला जाईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांचे २ आॅक्टोबर या तारखेकडे लक्ष लागले होते. मात्र हा मुहूर्त टळला आणि सरकारने या आंदोलकांची घोर निराशा केली. त्यामुळे आंदोलक महिला सरकारवर चिडल्या आहेत. त्यांच्या या असंतोषाचा भविष्यात भडका उडण्याची व दारू विरोधातील आंदोलने आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सरकारने गांधी जयंतीचा मुहूर्त टाळून जणू आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळेच या तरुण आंदोलकांनी शुक्रवारी थेट नागपुरात धडक देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीसुद्धा यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची आवश्यकता विशद केली. सरकारने मुहूर्त टाळला असला तरी आंदोलने सुरूच आहेत. विधीमंडळावर दोन लाखांचा मोर्चा काढण्याचे नियोजन केले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)