जिल्ह्यात २१ लाख ७२ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:00 AM2019-09-05T06:00:00+5:302019-09-05T06:00:07+5:30

२०१४ मध्ये सात विधानसभा क्षेत्रामध्ये २० लाख २५ हजार ८४३ मतदारांची नोंद करण्यात आली. ३१ आॅगस्टच्या अंतिम मतदार यादीत २१ लाख ७२ हजार १७४ मतदारांची नोंद करण्यात आली. गत पाच वर्षात एक लाख ४६ हजार ३३१ मतदार जिल्ह्यात वाढले आहेत.

The district has 3 lakh 8 thousand voters | जिल्ह्यात २१ लाख ७२ हजार मतदार

जिल्ह्यात २१ लाख ७२ हजार मतदार

googlenewsNext
ठळक मुद्देसात विधानसभा : दीड लाख मतदार वाढले

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. निवडणूक विभागाने ३१ आॅगस्टला मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली. या मतदार यादीनुसार जिल्ह्यात २१ लाख ७२ हजार १७४ मतदार विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. सन २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये एक लाख ४६ हजार ३३१ मतदार वाढले आहे. हे मतदार सात आमदारांची निवड करणार आहे.
विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वप्रक्रिया सुरू केली आहे. मतदारांची नावे नोंदविण्याचे काम निवडणूक विभागाने पूर्ण केले. यावर आक्षेपही मागविण्यात आले. त्यानुसार मतदार यादीमध्ये दुरूस्त्याही करण्यात आल्या.
२०१४ मध्ये सात विधानसभा क्षेत्रामध्ये २० लाख २५ हजार ८४३ मतदारांची नोंद करण्यात आली. ३१ आॅगस्टच्या अंतिम मतदार यादीत २१ लाख ७२ हजार १७४ मतदारांची नोंद करण्यात आली. गत पाच वर्षात एक लाख ४६ हजार ३३१ मतदार जिल्ह्यात वाढले आहेत. यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक एक लाख ९५ हजार ९७९ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ८८ हजार १३९ महिला मतदार आहेत. वणी विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ४७ हजार ५५२ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३६ हजार ९४५ महिला मतदार आहेत.
राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ४५ हजार १६० पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३८ हजार २९ महिला मतदार आहेत. दिग्रस विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ६७ हजार ६८० पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ५४ हजार ६७३ महिला मतदार आहेत.
आर्णी विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ६० हजार ८२९ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ५१ हजार १६४ महिला मतदार आहेत. पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ५४ हजार ३३४ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३८ हजार ८२२ महिला मतदार आहेत. उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ५३ हजार ५१८ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३९ हजार ३५० महिला मतदार आहेत.

३१ तृतीयपंथी मतदारांची नोंद
जिल्ह्यात ३१ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २१ तृतीयपंथी मतदारांची नोंद यवतमाळमध्ये करण्यात आली आहे. वणी विधानसभा क्षेत्रात तृतीयपंथी मतदारांची नोंद निरंक आहेत. इतर मतदान केंद्रावर १० तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

सहा मतदान केंद्र वाढविण्याचा प्रस्ताव
विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांच्या आधारावर मतदान केंद्राची निर्मिती करावी लागते. या निकषानुसार सहा मतदान केंद्र वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक विभागाकडे आला आहे. या व्यतिरिक्त २ हजार ४९१ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. त्याकरिता २ हजार ४९१ मतदान यंत्रे लागणार आहेत.

Web Title: The district has 3 lakh 8 thousand voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Votingमतदान