शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

जिल्ह्यातील पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहे. मात्र पोलिसांजवळ मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नव्हते. असुरक्षितरित्या ते कर्तव्य बजावत होते. ही बाब ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून उघडकीस आणली. याची संवेदनशील पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी तत्काळ दखल घेऊन सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांनी घेतली दखल : सुरक्षित राहून कोरोनाशी लढण्याचे निर्देश, सर्वच पोलीस ठाण्यात वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अखिल मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले आहे. या आणीबाणीच्या स्थितीतही पोलीस जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहे. मात्र पोलिसांजवळ मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नव्हते. असुरक्षितरित्या ते कर्तव्य बजावत होते. ही बाब ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून उघडकीस आणली. याची संवेदनशील पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी तत्काळ दखल घेऊन सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.शहर पोलीस ठाण्यातून मास्क व सॅनिटायझर वितरित करण्यात आले. यावेळी उपस्थित चार्ली कमांडोंना खुद्द एसपी एम. राज कुमार यांनी मास्क लावून दिला. सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असा सूचना केल्या. समाजाचा व प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक हा पोलीस आहे. त्याने स्वत:चे आरोग्य सांभाळून इतरांच्या आरोग्यासाठी ही लढाई लढायची आहे. याकरिता प्रत्येकाने योग्य ती दक्षता घ्यावी. जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने मास्क व सॅनिटायझर देण्यात आले आहे. त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करावा व इतरांनाही सांगावे, असे आवाहन एम. राज कुमार यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस